
आगामी निवडणुकांशी संबंधित सोशल मीडियावरील चर्चा-संवाद सुरक्षित ठेवण्याच्या दिशेने एक पाऊल उचलत, कू अॅपने ‘स्वैच्छिक आचारसंहिता’ स्वीकारली आहे. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) द्वारे तयार करण्यात आलेली, 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी IAMAI द्वारे भारतीय निवडणूक आयोगाकडे स्वैच्छिक आचारसंहिता सादर करण्यात आली.
निवडणुकीदरम्यान सोशल मीडियाचा न्याय्य आणि नैतिक वापर केला जावा हा संहितेचा उद्देश आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर येथे फेब्रुवारी ते मार्च 2022 दरम्यान होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी कू अॅपने आचारसंहिता स्वीकारली आहे. याद्वारे Koo आपल्या युजर्सना सुरक्षित आणि निष्पक्ष निवडणुकांबद्दल वचनबद्धतेची खात्री देते, तसेच व्यक्ती म्हणून त्यांचीही जबाबदारी अधोरेखित करते.
कू ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या रुपात एक महत्त्वपूर्ण सोशल मीडिया मध्यस्थ म्हणून, खास तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे जो लगेचच त्या-त्या वेळी तक्रारींची दखल घेतो. युजर्सचे अवमानास्पद आणि द्वेषपूर्ण गोष्टींपासून संरक्षण करतो. सोबतच समंजस ऑनलाइन वर्तनाला प्रोत्साहन देतो. यूजर्सना 10 भाषांमध्ये अभिव्यक्तीचा अवकाश देणारा हा बहुभाषी मंच अशा प्रकारच्या मार्गदर्शक तत्वांना लागू करणारा पहिलाच सोशल मीडिया मंच होता. कू प्रचलित नियमावलीनुसार अहवाल उपलब्ध करण्यासह विसंगत मजकुराला सक्रियपणे नियंत्रित करतो.
अप्रमेय राधाकृष्ण, सह-संस्थापक आणि सीईओ, कू म्हणाले, “आज सोशल मीडिया लोकांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो आहे. लोकांना निवडणूक प्रक्रियेबद्दल शिक्षित करण्यासाठी, तसेच त्यांच्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडण्यासाठी सोशल मीडिया महत्त्वाचा ठरू शकतो. एक निःपक्षपाती, पारदर्शक आणि विश्वासार्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून, कू कायमच IAMAI द्वारे तयार केलेल्या ऐच्छिक आचारसंहितेच्या उद्देशांप्रती समर्पित आहे. कू लोकशाहीचे वैशिष्ट्य असलेल्या स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेला सक्षम करण्यासाठी कार्य करेल. आमची सर्वोत्कृष्ट अनुपालन आणि तक्रार निवारण यंत्रणा युजर्सना त्यांचे विचार व्यक्त करत पसंतीच्या भाषेत आपापल्या समुदायांशी कनेक्ट होण्यास सुरक्षित ऑनलाइन वातावरण मिळवून देईल. युजर्सना भाषेचा सुरक्षित आणि आदर्श अनुभव देण्यासाठी कू अॅप सर्वोत्तम पद्धती आणि व्यवहार्य उपाय शोधण्याचा प्रयत्न करते.”
Leave a Reply