No Picture
Uncategorized

सु.रा.देशपांडे स्मृती पुरस्कार रविंद्र जोशी यांना जाहीर                              कोल्हापूर:आजरा येथील ज्येष्ठ पत्रकार, दुर्ग अभ्यासक आणि शिक्षक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे पहिले जनसंपर्क अधिकारी सु. रा. देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा पुरस्कार यंदा अक्षर दालनचे रविंद्र जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे. ख्यातनाम कवी अशोक नायगावकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवार दि. ६ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता राम गणेश गडकरी सभागृहात या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती डाॅ. सागर देशपांडे यांनी पत्रकातून दिली. ११ हजार रूपये रोख आणि मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.             शिक्षण, इतिहास, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात कामगिरी केलेल्या सु. रा. देशपांडे यांच्या सहाव्या स्मृतीदिनी हा कार्यक्रम होणार असून जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे, न्यू एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सल्लागार विनोदकुमार लोहिया यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.गेली ४५ वर्षे जोशी हे ग्रंथवितरण क्षेत्रात कार्यरत असून हे करताना त्यांनी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील विविध साहत्यिक, सांस्कृतिक आणि वाचन संस्कृती वृध्दींगत करणाऱ्या कार्यक्रमांसाठी पाठबळ दिले आहे. विविध साहित्य संमेलनांच्या नियोजनामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेण्यापासून ते गेली १२ वर्षे कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या अक्षरगप्पांच्या प्रारंभापर्यंतच्या उपक्रमांमध्ये जोशी यांचा नेहमी सक्रीय सहभाग राहिला आहे. विविध सामाजिक,साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्थाचे अक्षर दालन हे हक्काचे ठिकाण असून त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना सु. रा. देशपांडे स्मृती पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. याआधी डाॅ. सुनीलकुमार लवटे, अरविंद इनामदार आणि माजी खसदार प्रदीप रावत यांच्या हस्ते अनुक्रमे अनंतराव आजगावकर, किरण ठाकुर, प्रा. नवनाथ शिंदे  यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमासाठी अगत्याने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

February 2, 2023 0
No Picture
Uncategorized

Best dating sites

August 9, 2022 0

Many local newspapers had online personals in the mid 1990s but were bought out by these big dating sites. From some of the comments it really shows how desperate dating sites are for money that […]

Uncategorized

‘हर घर तिरंगा’ उपक्रमात अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घ्या : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

July 8, 2022 0

‘हर घर तिरंगा’ उपक्रमात अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घ्या : जिल्हाधिकारी राहुल रेखावार  11 ते 17 ऑगस्ट दरम्यान उपक्रम        कोल्हापूर : ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम 11 ते […]

Uncategorized

सहज सेवा ट्रस्ट च्या वतीने मोफत अन्नछत्राचे जोतिबा डोंगरावर आयोजन

April 13, 2022 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: गेली 19 वर्षे सातत्याने भक्तांच्या सेवेसाठी सहज सेवा ट्रस्टचे अन्नछत्र अहोरात्र सुरू असते. परंतु मागील दोन वर्षात कोरोना संकटामुळे व निर्बंधांमुळे जोतिबाची यात्रा होऊ शकली नाही. परंतु यावर्षी ही यात्रा 16 एप्रिल रोजी […]

Uncategorized

कोणत्याही कर्ज माफी योजनेचा लाभ मायक्रोफायनान्स कर्जाना मिळणार नाही

December 26, 2020 0

भारतामध्ये, आपण वेळोवेळी विभिन्न राज्यांमध्ये कर्ज माफी योजनांच्या घोषणा केल्या जाताना ऐकतो. या कर्ज माफी योजना फक्त बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जांसाठी लागू आहेत. मायक्रोफायनान्स कर्जे जी साधारणपणे छोट्या व्यवसाय गतिविधींसाठी दिली जातात ती पीक कर्ज […]

Uncategorized

डार्लिंग’चा धडाकेबाज ट्रेलर रसिकांच्या भेटीला…

December 23, 2020 0

अनलॉक सुरू झाल्यापासून मराठी सिनेसृष्टीत एकाच सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘डार्लिंग’ या आगामी मराठी सिनेमाच्या निर्मात्यांनी 26 जानेवारी 2021 ला सिनेमा रिलीज होणार असल्याचं घोषित करून सिनेमासृष्टीपासून रसिकांपर्यंत सर्वांचच लक्ष वेधून घेतलं. सुरूवातीला प्रदर्शित […]

Uncategorized

ध्यानासाठी मोफत ऑनलाईन महाशिबीर

December 21, 2020 0

कोल्हापूर /प्रतिनिधी: यंदाचे पूर्ण वर्ष कोरोना संसर्गाच्या विरुध्द लढण्यासाठी जात आहे. संपूर्ण जग त्याचा प्रतिकार करत असताना अशावेळी स्वत: ला शांत ठेवण्याचा सोपा मार्ग म्हणजे नियमित ध्यान. हिमालयातील ८०० वर्षे जुना पौराणिक ध्यान संस्कार ग्रहण […]

Uncategorized

‘बायकोला हवं तरी काय’ ला प्रेक्षकांची पसंती

December 15, 2020 0

ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रादेशिक भाषेतील दर्जेदार आणि  मनोरंजनात्मक कार्यक्रम घेऊन येणाऱ्या एमएक्स प्लेअरने प्रेक्षकांना दिलेले गुणवत्तेचे आश्वासन कायमच जपले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रेक्षकांनी ‘बायकोला हवं तरी काय’ या वेबसिरीजला दिलेली पसंती. प्रत्येक स्त्रीच्या मनात […]

Uncategorized

भारतीय अर्थ व कुटुंब व्यवस्था हिंदू पंचांगांवर अवलंबून असल्याने पंचांगास महत्त्व : पंचागकर्ते मोहन दाते

December 7, 2020 0

कोल्हापूर: हिंदूंची कालगणना लाखो वर्षे जुनी असून ती सूर्य-चंद्रयांच्या गतीवर आधरित आहे. तशीच ती निसर्गचक्र आणि ऋतूचक्र यांना अनुकूल आहे. त्यामुळे दरवर्षी सण, ऋतू, व्रते आदी दिवस पालटत नाही; मात्र अन्य पंथीयांची दोन-चार हजार वर्षांपूर्वी […]

Uncategorized

दुचाकीस्वार गायत्री पटेल यांची “वन ड्रीम वन राइड” उपक्रमांतर्गत भारत प्रवासाला सुरुवात

December 6, 2020 0

कोल्हापूर: कोल्हापूरच्या दुचाकी स्वार गायत्री पटेल या आजपासून “वन ड्रीम वन राइड” उपक्रमांतर्गत भारत प्रवासाला सुरुवात केली. टीव्हीएस अपाचे 200 आरटी या दुचाकीवरून पुढील सहा महिन्यात गायत्री तीस हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतर या मोहिमेत […]

1 2 3 256
error: Content is protected !!