पुरबाधीत क्षेत्रातील नागरीकांचा घरफाळा व पाणीपट्टी माफ होणार

 

कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या नैसर्गिक पूर परिस्थीमध्ये बाधीत झालेल्या मिळकत धारकांना घरफाळा बिलामध्ये व पाणी पट्टीमध्ये सवलत देणेबाबतचा निर्णय महासभेच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला आहे.महापालिकेच्या निर्णयाप्रमाणे नैसर्गिक अपत्तीमध्ये पडझड, पुर्ण बाधीत झालेल्या मिळकतीचा 100 टक्के तर अंशत: बाधीत झालेल्या मिळकतीचा घरफाळा 50 टक्के माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घरफाळा बिलामध्ये शासनाने कर वगळता  महापलिकेच्या इतर कराची रक्कम माफ करण्यात येणार असून याची अमलबजावणी 1 एप्रिल 2020 रोजी सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षाच्या बिलामध्ये सुट दिली जाणार आहे. यासाठी पडझड, पुर्ण बाधीत झालेल्या मिळकतीची माहिती महापालिकेच्या उपशहर अभियंता यांचेकडून घेऊन तसेच शासनाने पंचनामा केलेल्या मिळकतीची माहिती घेऊन अशा मिळकतींना महाराष्ट्र महापालिका नियमातील तरतूदीप्रमाणे कर माफी देणेची अमलबजावणी व पाणी पट्टीमध्ये ऑगस्ट-सप्टेंबरची सवलत डिसेंबर व जानेवारीच्या महिन्यात माफ करण्याच्या सूचना जलअभियंता यांना दिल्या. ठरावाच्या अंमलबजावणी करणेबाबतचा प्रस्ताव सादर केला असून यामध्ये शासनाचे जे टॅक्स आहेत ते माफ करणेबाबत शासनास प्रस्ताव सादर करावा लागणार असलेचे सांगितले. जिल्हा प्रशासनाकडून पूरबाधीत क्षेत्रातील मिळकतींचा सर्व्हे करण्यात आलेला आहे. ती यादी अंतीम होताच अंम्मलबजावणी करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!