
कोल्हापूर : महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये दैनंदिन निर्माण होणाऱ्या ई-वेस्ट चे संकलन, वर्गीकरण करुन या कचऱ्याची विल्हेवाट लावणेकामी आरोग्य विभागामार्फत एकुण 12 ठिकाणी ई-वेस्ट संकलन केंद्र उभारणेत आलेली आहे. यामध्ये कपिलतीर्थ मार्केट, कळंबा फिल्टर हाऊस, क्रॉ. गोविंदराव पानसरे विदयालय सानेगुरूजी, महाराणी ताराबाई विदयालय, शाहु क्लॉथ मार्केट, पद्रमाराजे शाळा शनिवार पेठ, पंचगंगा हॉस्पीटल, वि.स.खांडेकर शाळा रेडेचि टक्कर, तात्यासाहेब मोहिते विदयालय, शाहुपुरी, कावळा नाका एस बॅक जवळ, कसबा बावडा पॅव्हेलियन हॉल, महाडिक माळ कुंटुब कल्यान केंद्र क्र.6 इत्यादी ठिकाणी ई-वेस्ट कचरा संकलन केंद्र उभारणेत आलेली आहेत.तरी शहरातील सर्व नागरीकांना आपले कडील निर्माण होणारा इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचा कचरा इतरत्र कुठेही न टाकता वरील प्रमाणे संकलन केंद्राचे ठिकाणी देणेचा आहे. या व्यतिरिक्त मनपा कडिल दैनंदिनपणे येणाऱ्या घंटागाडी किंवा ऍ़टो टिपरकडे देवुन कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.
Leave a Reply