
कोल्हापूर:सध्या जगभऱ देशात व महाराष्ट्रात कोरोना या विषाणूने थैमान घातलेले असून या संदर्भात कठोर पावले उचलताना गर्दीच्या ठिकाणी एकत्र न येण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काळजी घेण्याचे आवाहन करत कोल्हापूर जिल्हातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व शाळा व महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. पण प्राध्यापक तसेच इतर कर्मचारी नेहमीप्रमाणे संस्थेमध्ये हजर राहत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून या परिस्थितीवर उपाय योजना म्हणून साळोखेनगर मधील डी.वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजने अत्याधुनिक व्हरच्युअल क्लासरूमची सुरूवात केली आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून महाविद्यालयातील प्राध्यापक गुगल क्लास रूम, क्लाऊड कॉम्प्यूटींग, एक्स रेकॉर्डऱ ,मुडल तसेच व्हॉटस् ॲप फेसबुक व युटूब या माध्यामांचा वापर करत आहेत. याद्वारे त्यांचे नियमित अध्यापन सुरू ठेवले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे व शंकांचे घरबसल्या निरसन होत असून क्लासमध्ये न बोलणारे विद्यार्थीं सोशल मिडीयाच्या व्यासपीठावर व्हरच्युअल क्लासरूमच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.तसेच क्लाऊड कॉम्पुटिंग माध्यमातून असाइंनमेंट सुद्धा घरबसल्या पूर्ण करत आहेत.याला विद्यार्थ्यांची उपस्थितीसुद्धा ऑनलाइन पध्दतीने घेण्यात येत असून एखादा मुद्दा न कळल्यास पुन्हा सांगून शंकेचे निरसन करणयात येत आहे.आणि या संकल्पनेस विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.पारंपारिक क्लासरूमपेक्षा नाविण्यपूर्ण उपक्रम असल्याने डी. वाय.पाटील इंजिनीरिंग कॉलेजने सुरू केलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून बाकीच्या महाविद्यालयानेसुद्धा याचे अनुकरण करावे, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.पी.कल्लीमनी व उपप्राचार्य डॉ.अभिजीत माने यांनी पत्रकारांशी बोलताना आवाहन केले. विद्यापीठाच्या नियमानुसार परीक्षा कधीही झाल्या तरी विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण असेल. यामुळे उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय पाटील, उपाध्यक्ष सतेज पाटील, विश्वस्त सौ. प्रतिमा पाटील ,ऋतुराज पाटील यांनी संकल्पनेचे कौतुक केले आहे. पत्रकार परिषदेस प्रा.राहुल पाटील, प्रा.सुयोग पाटील, प्रा.प्रवीण देसाई,प्रा. अजित चौगुले, प्रा.अतुल कुंभार आदी उपस्थित होते.
Leave a Reply