
कोल्हापूर : विमानतळाच्या विकास व विस्तारीकरणासाठी विमानतळाशेजारील वनविभागाच्या मालकीची 10.93 हेक्टर वनजमीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने व प्रयत्नातून आज विमानतळ प्रधिकरणास हस्तांतरित करण्यात आली.करवीरच्या वन परिक्षेत्र अधिकारी सोनल केसरकर यांनी जमीन हस्तांतरणाची कागदपत्रे विमानतळ संचालक कमलकुमार कटारिया यांच्याकडे आज सुपूर्द केली.विमानतळ विकासासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीचा प्रश्न सन 2013 पासून प्रलंबित होता. पालकमंत्री सतेज पाटील आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या प्रयत्नातून आणि पुढाकारातून हा प्रश्न मार्गी निघाला. करवीर तालुक्यातील मुडशिंगी गावच्या हद्दीतील गट क्र. 337/1, 338/1 आणि कंपार्टमेंट क्र.- 387 अ मधील 10.93 हेक्टर जमीन विमानतळ विकासासाठी उपलब्ध झाली आहे. प्राधिकरणास उपलब्ध झालेल्या जमिनीचा वापर एम टी वर्कशॉप, फायर स्टेशन, नाईट लॅडिंग आणि एअर ट्रॕफीक कंट्रोल युनीटसाठी करण्यात येणार असल्याचे, श्री. कटारिया यांनी सांगितले.
Leave a Reply