
कोल्हापूर: कोरोना महामारी च्या काळात रिक्षा चालकांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने कोल्हापूर शहरातील विविध रिक्षा संघटनेच्या माध्यमातून रिक्षाचालकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.जवळपास एक हजार रिक्षाचालकांना याचा लाभ होणार असून आज याची सुरवात करण्यात आली तसेच घरेलू मोलकरीण संघटना आणि समाजातील गोरगरीब लोकांना सुध्दा किटचे वाटप येत्या काही दिवसात करण्यात येणार आहे, असे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. यावेळी रिक्षा चालक, मालक व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर देवस्थान समिती सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सहाय्यक सचिव इंगवले ,श्री. मिटके आणि रिक्षा संघटनेचे राजू जाधव,चंद्रकांत भोसले, विजय गायकवाड, वसंत पाटील, शंकर पंडीत, अविनाश दिंडे, महेश मस्के, विजय जेधे,दिलीप बोंद्रे आणि मान्यवर उपस्थित होते
Leave a Reply