
कोल्हापूर:आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका आज मराठा आरक्षणाला बसला. फडणवीस सरकारने उच्च न्यायालयात जिंकलेल्या लढाईला सर्वोच्च न्यायालयात ब्रेक लागला.मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नोकरीतील १३ टक्के व शिक्षणातील १२ टक्के आरक्षणाच्या अंमलबजावणीला आज स्थगिती दिली. यातून आघाडी सरकारची या विषयासंबंधीची अनास्थाच दिसून येते. याआधीही भारतीय जनता पार्टीने या प्रकरणी वेळोवेळी सरकारला सावध केले होते. तसेच सत्तेवर असताना उच्च न्यायालयात अत्यंत मजबूतरितीने आरक्षणाच्या बाजूने पक्ष उभा केला होता. परंतु सध्याच्या सरकारने अत्यंत बेजबाबदारपने या विषयाकडे पाहिले. मातब्बर वकील असूनही अत्यंत कमकुवत असे वकिल या सरकारने उभे केल्यामुळे व त्यांना योग्य युक्तिवाद मांडता न आल्यामुळे आरक्षणास स्थगिती मिळाली आहे.मोठ्या संघर्षातून मराठा समाजाने मिळवलेल्या या आरक्षणाला जर धक्का लागला तर समाजाचा पुन्हा उद्रेक होईल. मराठा समाजाला आज सुप्रिम कोर्टात न्याय मिळवून न दिल्यामुळे आघाडी सरकारला समाजाच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल.अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी दिली.
Leave a Reply