
कोल्हापूर/ प्रतिनिधी: शिवाजी विद्यापीठाशी सलग्न असणाऱ्या आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कॉलेजमध्ये पदव्युत्तर मास्टर ऑफ व्होकेशन साठी ग्राफिक डिझाईनिंग व फौंड्री टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमास नुकतीच मान्यता मिळाली आहे. महाविद्यालयात कौशल्यावर आधारित व्यावसायिक शिक्षण अंतर्गत व ग्राफिक डिझाईन, फाउंड्री टेक्नॉलॉजी आणि ऍनिमेशन व फिल्ममेकिंग हे अभ्यासक्रम शिकवले जातात.
यंदा फोटोग्रफी अँड व्हीडिओग्रफी अभ्यासक्रमाकरिता मंजुरी मिळालेली आहे. तसेच कम्युनिटी कॉलेजअंतर्गत महाविद्यालयात ॲडव्हान्स डिप्लोमा इन फोटोग्राफी व डिप्लोमा टेक्नॉलॉजी फोटोग्राफी या पदविका अभ्यासक्रमासह ही मंजुरी मिळालेली आहे, असे प्राचार्य डॉ.डी.बी. पाटील यांनी सांगितले
कलानगरी मध्ये एम.व्होकसारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची गरज होती. पदवी पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना इतरत्र कोठेही जाण्याची आवश्यकता नाही. चित्रपटसृष्टीचे माहेरघर असलेल्या करवीर नगरी मध्ये कलाकारांना छायाचित्रांमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी या तीन पदविका अभ्यासक्रम मंजूर झाले आहेत. तसेच बी.व्होक या व्यावसायिक पदवीनंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये एम.व्होक या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाकरता बारावी कोणत्याही शाखेचा बारावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो, असे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी सांगितले. यासाठी सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, सहसचिव प्राचार्य डॉ. युवराज भोसले समन्वयक प्रा. सतीश गायकवाड यांचे सहकार्य लाभले आहे.
Leave a Reply