
कोल्हापूर:साडे तीन शक्ती पीठांपैकी एक अश्या दक्षिण काशी असणाऱ्या कोल्हापुरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी श्री देवी अंबाबाईची परशरांना महाविष्णू स्वरूपात पूजा बांधण्यात आली आहे.
श्री महालक्ष्मी जन्मा घोर तप करणाऱ्या पराशरांना महाविष्णू स्वरूपात दर्शन देते तेव्हा त्यांचा सर्व संशय भेदभाव फिटतो व ते महालक्ष्मीला विष्णू स्वरूपिणी जाणून तिच्यापुढे नतमस्तक होतात व सर्व संशय हरण करणाऱ्या हस्तकांनी स्तुती करतात ही पूजा मकरंद मुनेश्वर व माधव मुनिश्वर यांनी बांधली आहे.
Leave a Reply