राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा: आम आदमीची मागणी

 

कोल्हापूर: राज्यात पावसाची सुरवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आणि मोठ्या प्रमाणात
सोयाबीनची उगवण झाली नाही. याबाबत राज्यभर तक्रारी आल्यानंतर बियाणे व त्याच्या कंपन्यांची चौकशी करण्यात आली होती आणि बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे उगवण शक्ती कमी होती, त्यामुळे शेतकऱ्याला दुबार पेरणी करावी
लागली.त्यानंतर अनेक भागात दुबार पेरणी झाली, सोयाबीन सोबतच मुग, उडीद हे पिके बऱ्यापैकी आले होते, परंतु यावर्षी गेल्या दोन महिन्यात जोरदार वादळी पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेली पिके कापणी करण्यापूर्वी खराब झालीत. विदर्भ, मराठवाडा व इतर भागात सोयाबीन वर येलो मोजाक नावाची कीड आल्यामुळे सोयाबीनला लागलेल्या शेंगा भरल्याच नाहीत हे वास्तविकता आहे. विदर्भ व मराठवाडा या भागात सोयाबीनचे उत्पादन प्रमाण ही निम्म्यापेक्षा कमी येत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र इत्यादी भागातील कपाशीचे बोंड (पिक) सडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. विदर्भातील संत्रा पिकाचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पूर्व विदर्भात मानव निर्मित पूर आल्यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली आली, गावातील नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे, त्यांनाही पूर्ण पणे मदत मिळालेली नाही. जेथे मिळाली ती फारच तुटपुंजी आहे. एकूणच राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती विदारक आहे. त्यामुळे सरकार कडून शेतकऱ्यांना मदत मिळणे आवश्यक आहे. यासंदर्भात आम आदमी पार्टीने निवेदन नायब तहसिलदार आनंद गुरव यांना दिले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, जिल्हा सचिव जयवंत पोवार, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात काणेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, आदम शेख, शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे, अभिजित भोसले आदी उपस्थित होते.यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा,प्रती हेक्टर दिल्ली सरकार प्रमाणे ५० हजार रुपये मदत जाहीर करावी, कपाशीचे पंचनामे करून अहवाल सादर करावेत,सोयाबीन, धान व कपाशी खरेदी हेतू सरकारी यंत्रणा उभी करावी, पूर्व विदर्भात मानव निर्मित पूरामुळे झालेल्या व फळबागांचे नुकसान झाले आहे, तेथे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी.या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!