
कोल्हापूर: महापौर सौ. निलोफर आश्कीन आजरेकर यांनी आपला वाढदिवस करोनाच्या पार्श्वभूमीवर “माझा प्रभाग माझे कुटुंब” यानुसार साजरा केला. यापूर्वी प्रभागातील नागरिकांना करोना पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाफेचे मशीन वाटप केले होते. सध्या करोनाचा प्रभाव असल्यामुळे व करोनाच्या काळात को. म.न.पा.चे आरोग्य खात्यातील कर्मचा-यांनी अत्यंत धाडसाने प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सातत्याने कार्यरत राहिल्याने त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी महापौर सौ. निलोफर आश्कीन आजरेकर यांनी वाढदिवसाच्या सर्व खर्चाला फाटा देवून कर्मचाऱ्यांना वाफेचे मशीन भेट देवून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेत वाढदिवस साध्यापणाने सर्व कर्मचाऱ्यांचे समावेत साजरा केला. यावेळी त्यांचे कुटुंबातील लहान मुले व आश्कीन आजरेकर, सॅनिटरी इन्स्पेक्टर मनोज लोट, मेहरुद्दीन शेख व सफाई कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply