कोल्हापूर: सणासुणीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपर्यंत शनिवारीही गुजरी सराफ बाजार सुरू राहणार असल्याची माहिती कोल्हापूर सराफ व्यापारी व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी दिली.ते म्हणाले, कोरोनामुळे ठप्प असलेल्या गुजरीमध्ये हळूहळू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत शनिवारी बाजार सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार उद्या (ता. २४), ३१ ऑक्टोबर, ७ व १४ नोव्हेंबर या दिवशी शनिवारी साप्ताहिक सुट्टी न घेता बाजार सुरू राहील.दरम्यान, प्रशासनाने लागू केलेले नियम, अटी व शर्तींचे सर्व सराफ व्यावसायिकांनी काटेकार पालन करावे. यामध्ये हँडग्लोज, सॅनिटायझर, सामाजिक अंतर या बाबींकडे लक्ष देऊन व्यवसाय करावा, असे आवाहनही श्री. गायकवाड यांनी यावेळी केले.
Leave a Reply