
भडगांव : ता.कागल, जि.कोल्हापूर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. याबाबत गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसैनिकानीं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. यासह शासनाच्या राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम आराखडा २०१८-१९ मधून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनास शिफारस करण्याची विनंती केली होती. त्यानुसार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर साहेबांनी तातडीने राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम आराखडा २०१८-१९ मधून ग्रामपंचायत भडगांव, ता.कागल, जि.कोल्हापूर येथील शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प मंजुरीसाठी शिफारस केली. यासह वेळोवेळी याकडे पाठपुरावा केला. नुकतीच या प्रकल्पास मंजूर मिळाली असून, योजनेस रु.९१ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर साहेबांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे. आज ग्रामपंचायत भडगांव, ता.कागल, जि.कोल्हापूर यांच्यावतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणेत आला. यावेळी सरपंच सौ.आनंदी निवृत्ती चौगले यांनी पत्राद्वारे, आभार मानत ग्रामसभा सभागृहात अभिनंदनाचा ठराव करण्यात आला आहे व पुढील काळात सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी श्री.मारुती पुरीबुवा, उप सरपंच श्री.दिग्विजय दिनकर पाटील, श्री.रामचंद्र चौगले, श्री.धोंडीराम भांडवले, श्री.आनंदा खोंद्रे, श्री.सुशांत भांडवले, श्री.स्वप्नील चौगले, श्री.निलेश पाटील, श्री.हरी सुतार, श्री.सुहास पाटील, व्यापारी महासंघाचे श्री.अमर क्षीरसागर आदी उपस्थित होते.
Leave a Reply