
कोल्हापूर :कोल्हापूर रिअल्टर्स वेलफेअर असोसिएशन , कोल्हापूर या संस्थेची चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा काल बुधवार दि. २८/१०/२०२० रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. रत्नेश शिरोळकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. कार्यरत संचालक मंडळाचा दोन वर्षाचा कार्यकाल संपवून नवीन संचालक मंडळ स्थापन करण्यात आले.
सन २०२० ते २० २२ करीता अध्यक्ष – श्री. सुनील देसाई, उपाध्यक्ष – श्री. नितीन केसरकर, सचिव – श्री. अमरनाथ शेणेकर, सहसचिव – श्री. सुशांत गोरे, खजानीस – श्री रवि म्हाकवेकर, संचालक मंडळ – श्री. संजय साळसकर, श्री. सिकंदर देसाई, श्री. रविराज गायकवाड, श्री. संजय यादव व श्री. किशोर माने असे मंडळ कार्यरत असणार आहे. श्री. रत्नेश शिरोळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी लावलेल्या या रोपट्याचा वृक्ष होऊ लागला आहे. KRWA ही संस्था 2016 मध्ये स्थापन झाली असून शहरातील रियल इस्टेट एजंट साठी काम करणारी एक अग्रगण्य संस्था असून ती राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल असोसिएशन ऑफ रियलटर्स सोबत संलग्न आहे संस्थेचे कार्य कोल्हापूर शहरात तसेच जिल्हयामध्ये चालू असून ती आपल्या सभासदांना व इतर व्यावसायिक बांधवा करिता व्यावसायिक मार्गदर्शन व इतर विविध उपक्रम राबवत असते त्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत असते. नुकतेच कोविड-१९ जागतिक महामारी मध्ये सीपीआर हॉस्पिटलला १० बेड भेट देत समाजकार्यही केले आहे.
Leave a Reply