
कोल्हापूर: सध्या देशभरात कोरोना या महामारीमुळे अनेकजण मृत्यूमुखी पडत आहेत व रुग्ण संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यावर संजिवनी म्हणून रेमडेसिवीर इंजेक्शनला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व महाविकास आघाडी रेमडेसिवीरची इंजेक्शन्स व लसीचा पुरवठा करण्यासाठी पराकष्टा करीत आहेत. जेणेकरुन महाराष्ट्रातील जनतेला दिलासा मिळावा व महाराष्ट्र लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहेत.
अशा परिस्थितीमध्ये प्रेताच्या टाळुवरचे लोणी खाणारे महाचोर काळाबाजार करताना सापडले. या काळाबाजार करणा-या लोकांवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात ठोस पावले उचलावित, तसेच हे इंजेक्शन्स बाजारात कोणत्या वितरका मार्फत आले या चोरांपर्यंत पाठवणारे कोण डाॅक्टर आहेत? याचा कसून शोध व्हावा व संबंधितावर कठोर कारवाई होवून त्यांचे परवाने व पदवी रद्द करण्यात यावे अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी केली.याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना देण्यात आले. यावेळी शिवाजी जाधव , मंजित माने , हर्षल सुर्वे, सुजित चव्हाण, विशाल देवकुळे, अभिजित बुकशेट , प्रवीण पालव उपस्थित होते.
Leave a Reply