
कोल्हापूर : लक्षणे नसलेल्या कोरोना रूग्णांसमोर सध्या आपण कोणते उपचार घेतले पाहिजेत याबाबत योग्य मार्गदर्शन होत नसल्याचे दिसून येते आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी कोल्हापूर वतीने भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भाजपा कार्यालय बिंदू चौक येथे अशा रूग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाला आवश्यक असणाऱ्या आयुर्वेदिक, होमिओपॅथीक व अॅलोपॅथी औषधांचे मोफत कीट देण्याच्या सेवा कार्याची सुरवात करण्यात आली. यावेळी भाजपा प्र.का.सदस्य महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, अजित ठाणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
Leave a Reply