
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील मृत्युदर हा दिवसें-दिवस वाढतच चालला असल्याकारणाने हा मृत्यु दर नियंत्रणात आणावयाचा झाल्यास शासकीय महाविद्यालय शेंडा पार्क याठिकाणी अत्याधुनिक व्हेंटिलेटर प्रणाली तसेच हाई फ्लो ऑक्सिजन कॅनोला व बायपे युक्त 200 खाटांचे ॲडव्हांन्स कोरोना केअर युनिट युध्दपातळीवर उभा करावे अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी राज्याचे मुख्यमंत्री नाम. उध्दवजी ठाकरे यांचेकडे राज्यातील शिवसेना खासदारांच्या व्हिडिओ काँन्सफरंन्सव्दारे बोलावलेल्या बैठकीदरम्यान केली. सिरीयस झालेले पेशंट वाचवण्यासाठी हीच उपकरणे फार मोलाची ठरतात असे निष्कर्ष वैद्यकीय क्षेत्रामध्ये निघालेला आहे अशा प्रकारचे रुग्णालय उभा करून त्याची व्यवस्था ही सेवाभावी संस्था किंवा कंत्राटी पद्धतीने खासगी संस्थांना देऊन येणाऱ्या कालावधीसाठी ही महामारी कोकणामध्ये अत्यंत उपयुक्त ठरू शकेल अशी चर्चा यावेळी झाली. खासदार मंडलिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथून या व्हि.सी. व्दारे.मुख्यमंत्री महोदयांशी संवाद साधला.
Leave a Reply