
कोल्हापूर: शिवसेनेच्या वतीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे
हळदयुक्त गरम दूध वाटण्याचा उपक्रम घेण्यात आला असून हळद युक्त दूध वाटपाचा उपक्रम शनिवार दि २२ मे पर्यत रोज सकाळी ९ ते १० वाजेपर्यत घेण्यात येणार आहे.
याचा लाभ सीपीआरमधील , रुग्णांच्या नातेवाईकांना होत आहे
अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे यांच्या हस्ते याची सुरुवात करण्यात आली.
जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.या वेळी सुजित चव्हाण, शिवाजी जाधव ,हर्षल सुर्वे ,संजय जाधव, अभिजित बुकशेट ,बापू कोळेकर, प्रवीण पालव ,राजू इंदुलकर, निलेश जाधव,बंटी सावंत, डॉ.वेंकेटेश पवार, डॉ.अपरिजित वालावकर,डॉ,गिरीश कांबळे आदी उपस्थित होते.
Leave a Reply