
कोल्हापूर: वेणुताई यशवंतराव चव्हाण होमिओपॅथीक मेडीकल कॉलेज, दसरा चौक, येथे मावळा ग्रुप व यशवंतराव चव्हाण हॉमोओपॅथीक हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या शहाजीराजे कोविड सेंटरचे आज उद्घाटन झाले. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या रुग्ण संख्या जास्त आहे. मृत्यूचे प्रमाण अधिक आहे या पार्श्वभूमीवर मावळा ग्रुप आणि वेणूताई होमिओपॅथीक मेडिकल हॉस्पिटल यांनी सामाजिक बांधीलकी जपत सुरु केलेल्या या कोवीड सेंटरमुळे सर्वसामान्य व गरीब कुटूंबातील रुग्णांची सोय होणार आहे.तसेच अश्या प्रकारची कोव्हिड सेंटर्समुळे प्रशासनाला खूप मदत होते.आणि रुग्णांना दिलासा मिळेल असे मत मालोजीराजे छत्रपती आणि आमदार चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केले.
यावेळी सौभाग्यवती मधुरिमाराजे छत्रपती, शाहू शिक्षण संस्था अध्यक्ष मानसिंग बोंद्रे, संदिप चव्हाण, मावळा ग्रुपचे अध्यक्ष उमेश पोवार, संतोष हेब्बाळ, मानसिंग देसाई, उदय देसाई, शिवप्रसाद यादव, विनय काटकर, राहुल कुलकर्णी, तुषार संकपाळ, अभिजीत भोसले, नामदेव पोवार, प्रतिक खाडे, कोल्हापूर सराफ व्यापारी संघ अध्यक्ष कुलदीप गायकवाड आदी उपस्थित होते.
Leave a Reply