
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या वतीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय,सेवा हॉस्पिटल,आयसोलेशन हॉस्पिटल कोल्हापूर येथील रुग्णांना व नातेवाईकांना जागतिक दुग्ध दिना निमित्ताने संघाकडून एक हजार सुगंधी दुधाचे पॅकेट वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी) म्हणाले दूधाचा मानवी जीवनाशी अगदी प्राचीन कालखंडापासून संबंध आहे. दूधाला पूर्णान्न मानतात त्यामुळे दूधाचा दैनंदिन जीवनात अधिक वापर असलाच पाहिजे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारिरीक प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जास्तीत जास्त पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. आजच्या जागतिक दुग्ध दिना पासून उत्तम जीवन जगण्यासाठी उत्तम गुणवत्तेचे दूध आपल्या दैनंदिनी अहारामध्ये वापर करण्यास सुरवात करावी असे आवाहन केले.चेअरमन विश्वास पाटील (आबाजी), सी.पी.आरचे अधीक्षक डॉ.सत्यवान मोरे,सेवा हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ.उमेश कदम,आयसोलेशन हॉस्पिटलचे डॉ.रमेश जाधव, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, अभिजित तायशेटे, संभाजी पाटील,बयाजी शेळके,मार्केटींग अधिकारी उपेंद्र चव्हाण, लक्ष्मण धनवडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील सी.पी.आर.चे बंटी सावंत अभिषेक डोंगळे राजवीर नरके व इतर कर्मचारी आदि उपस्थित होते.
Leave a Reply