
मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन विश्वास पाटील व नूतन संचालक मंडळाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी उद्धव ठाकरे व उप मुख्यमंञी अजित पवारसो व महसूल मंत्री बाळासाहेब थोरातसो यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ग्रामविकास व कामगार मंत्री मान. नाम. हसन मुश्रीफ, गृह, गृहनिर्माण, परिवहन, व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्रजी पाटील-यड्रावकरसो उपस्थित होते.
यावेळी गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील व संचालक मंडळाने मुंबई येथील प्रतिदिनी विक्री १० लाख लिटर्स इतकी असून १०लाख लिटर्स पॅकिंगसाठी किमान १० एकर जागा शासनांकडून उपलब्ध झालेस जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादकांना दिलास मिळणार आहे. तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत (आर.के.यु.वाय) चार चिलिंग सेंटरचे आधुनिकरण व विस्तारीकरण व दुग्ध व्यवसायासमोर असणा-या अडी-आडचणीबाबत व संघाच्या प्रलंबित असणा-या विविध प्रस्तावांना मंजुरी मिळणेबाबत संघाच्या मागण्याचेमुख्यमंञी यांचेकडे निवेदन दिले.यावेळी सदरचे सर्व प्रस्ताव मंजुर करण्याचे आश्वासन दिले. तसेच जागतिक पातळीवर ठप्प झालेली अर्थव्यवस्था कोरोनाचे संकट यामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले, असताना सुद्धा गोकुळची संकलन, प्रक्रिया व वितरण व्यवस्था सुयोग्य पद्धतीने चालू ठेवून आपण वेगळा ठसा उमटवला व जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना व ग्राहकांना दिलासा दिला आहे. अशावेळी दुध व्यवसाय हाच एक शेतकऱ्यासाठी आशेचा किरण बनला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे व्हावे असे मार्गदर्शन करून व सर्व नूतन संचालकांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंञी महोदय याचीही सदीच्छा भेट घेतली असता. त्यांनीही गोकुळच्या उत्कृष्ट कामकाजाबाबत गौरवउद्गार काढले उच्चतम गुणवत्ता त्याच बरोबर उत्पादकांसोबत ग्राहकांचे हित व आधुनिकतेची जोड या मध्ये गोकुळ नेहमीच अग्रेसर राहिला आहे. राज्यात तसेच राज्या बाहेर ही गोकुळने आपले व्याप्ती वाढवावी. या कोरोना च्या काळात सुद्धा गोकुळ दूध संघ पुणे, मुंबई या मोठ्या शहरांना अतिशय चांगला पद्धतीने दूध पुरवठा करत आहे.
यावेळी ग्रामविकास व कामगार मंत्री मान. नाम. हसन मुश्रीफ, गृह, गृहनिर्माण, परिवहन, व पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील–चुयेकर, अजित नरके,नविद मुश्रीफ, कर्णसिंह गायकवाड, अभिजित तायशेटे, रणजितसिंह पाटील, संभाजी पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, उपस्थित होते.
Leave a Reply