
कोल्हापूर/ प्रतिनिधी: वैद्यकीय क्षेत्रात एखाद्या व्यक्तीला बरं करणे हे मोठे आव्हान असते. या क्षेत्रामध्ये टिकण्यासाठी मानसिक धैर्य व चिकाटीची गरज असते.ही चिकाटी आणि काम करण्याची क्षमता महिलांकडे अधिक प्रमाणात आहे. किचकट व वेळखाऊ शस्त्रक्रिया असोत किंवा वैद्यकीय क्षेत्रात होणारे रोज नवनवीन संशोधन असोत, उच्चशिक्षीत महिला डॉक्टरांनी यात प्राविण्य मिळवत हे आव्हान स्वीकारले आहे.यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा कोल्हापूरने ही महिला डॉक्टरांच्या स्वतंत्र विभागाची म्हणजेच ” *वुमन्स *डॉक्टर विंग”* ची निर्मिती केली आहे. स्त्रियांचे अनेक आजार असतात. ज्या ते उघडपणे सांगू शकत नाहीत. पण डॉक्टर जर एखादी स्त्री असेल तर त्या खुलेपणाने बोलू शकतात. आयएमए ने स्त्री-पुरुष असा कोणताही भेद न करता महिला डॉक्टर्सना नेहमीच प्राधान्य दिले आहे, असे कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. आशा जाधव यांनी स्पष्ट केले. ही महिला डॉक्टरची मजबूत टीम आणि त्यातील एक एक स्त्री रोग तज्ञ असोसिएशनच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातून स्त्रियांच्या आजाराचे व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा विश्वासही डॉ.आशा जाधव यांनी व्यक्त केला.
२०२१-२०२२ साठी या विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. विभागातील महिला डॉक्टर्सची नावे:
महाराष्ट्र राज्य अध्यक्षा डॉ.आशा जाधव
कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा डॉ. नीता नरके
उपाध्यक्षा डॉ. उन्नती सबनीस
सचिव डॉ. गायत्री होशिंग
खजानिस डॉ. भारती दोशी
सहसचिव डॉ. रूपाली दळवी
सल्लागार:
डॉ.प्रतिभा भूपाळी ,डॉ. राधिका जोशी, डॉ. रोहिणी लिमये, डॉ. विद्युत शहा.
सदस्य :
डॉ. मेघना चौगुले, डॉ. मीता बुरांडे, डॉ. संजना बागडी, डॉ. रेश्मा पवार, डॉ.ईशा जाधव, डॉ. संगीता निंबाळकर, डॉ. मीनाक्षी काळे,डॉ.भारती घोटणे, डॉ. गौरी प्रसाद, डॉ.माहेश्वरी जाधव
Leave a Reply