
कोल्हापूर:पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरवाढी विरोधात आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथे आंदोलन करण्यात आले. मोदी सरकार पेट्रोल-डिझेलच्या करामधून लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे.युपीए सरकारच्या काळामध्ये पेट्रोलवर एक्साईज ड्युटी 9.48 रुपये होती ती आज 32.90 रुपये म्हणजे 258% वाढ. डिझेलवरील एक्साईज ड्युटी 3.56 रुपये होती ती 31.80 रुपयांवर गेली आहे म्हणजे 820% वाढ.केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे.या एक्साईज ड्युटीतून मोदी सरकारने गेल्या ७ वर्षात तब्बल २० ते २५ लाख कोटी रुपयांची लुटमारी केली आहे. तसेच २००१ ते २०१४ या चौदा वर्षाच्या काळात पेट्रोल डिझेलवर प्रति लिटर १ रुपया सेंट्रल रोड फंड सेस लावला जात होता. २०१८ मध्ये १८ रु. प्रतिलिटर केला.केंद्रात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंहजी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रणित युपीएचे सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलरपेक्षा जास्त प्रती बॅरल असतानाही देशांतर्गत किमतीवर त्याचा परिमाण होऊ दिला नाही. सामान्य लोकांना दिलासा देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती.
Leave a Reply