
कोल्हापूर : कोरोनाच्या संकट काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन चांगली कामगिरी करीत असून, राज्य शासनासह कोरोना काळात माणुसकीच्या नात्याने कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या कार्याला बळकटी देण्यासाठी वाढदिवसाचे औचित्य साधून वस्तू आणि आर्थिक स्वरूपात मदत करून हा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. शिवसेना नेते, युवा सेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे वाढदिवस कोल्हापूर शहर शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यावेळी बोलतना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, शिवसैनिक आणि युवासैनिकांसाठी पर्वणी आहे. कोरोना काळात अनेक सेवा भावी संस्था काम करत असून त्यांच्या कार्याला बळकटी देणे आपली जबाबदारी आहे. यातूनच केलेल्या आवाहनास दाद देत मेनन बेअरिंग कंपनीचे चेअरमन नितीन मेनन यांनी ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची उपलब्ध करून दिले.५ लाखांचे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि एक हजार गरजू नागरिकांना रु.१० लाखाचे जीवनावश्यक वस्तूंचे किट प्रदान सोहळा पार पडला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष
राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मोफत ऑक्सिजन सेवा राबविणाऱ्या मणेर मस्जिद ट्रस्टला दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर प्रदान करण्यात आले. कोरोना काळात माणुसकीच्या नात्याने कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोव्हीड सेंटरला आर्थिक स्वरूपात मदत जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर यासह गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूच्या कीटचे वाटप करण्यात आले. यानंतर सेवाभावी संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोव्हीड सेंटरला युवासेनेच्या पदाधिकारी यांनी जावून आर्थिक मदतीचे धनादेश प्रदान केले. यामध्ये गांधी मैदान येथील कै.विष्णुपंत इंगवले कोव्हीड सेंटरला रु.१ लाख, दिगंबर जैन बोर्डिंग येथील व्हाईट आर्मीच्या कोव्हीड सेंटरला रु.५० हजार आणि व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या संताजी घोरपडे मोफत कोव्हीड सेंटरला रु.५० हजार अशी मदत करण्यात आले.यावेळी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, माजी नगरसेवक राजू हुंबे, मेनन कंपनीचे विकास पाटील, पानपट्टी सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण सावंत, शिवसेना उपशहरप्रमुख सुनील जाधव, रमेश खाडे, जयवंत हारुगले, रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, निलेश हंकारे, अभिषेक देवणे, रियाज बागवान, अंकुश निपाणीकर, साहिल बागवान, रणजीत मिणचेकर, राज अर्जुनिकर, विशाल पाटील, मणेर मस्जिद ट्रस्टचे हिदायत मणेर, शफिक मणेर, इम्रान मणेर, मेहबूब नदाफ, शकील पटवेगार, हमीद मणेर, गवळी समाजाचे बबन गवळी, युवा सेनेचे सौरभ कुलकर्णी, आदर्श जाधव आदी शिवसेना, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply