आ. प्रकाश आवाडेनी माहिती न घेता सनसनाटी वक्तव्ये टाळावीत:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

 
कागल:आमदार प्रकाश आवाडे यांचा कागलबद्दल प्रचंड गैरसमज निर्माण झाला आहे. कोणतीही माहिती न घेता ते करत असलेली सनसनाटी वक्तव्ये टाळावीत, असा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. 
कोरोना लसीकरण हातकणंगलेपेक्षा कागलला जास्त झाले आहे, असे वक्तव्य करुन श्री.आवाडे यांनी मुश्रीफांना लक्ष्य केले होते.
कागलमध्ये डी.आर.माने महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत मंत्री श्री.मुश्रीफ बोलत होते.पुढे बोलताना मुश्रीफ म्हणाले, हातकणंगले तालुक्यात पहिला डोस एक लाख, ७७ हजार, ५६५ व दुसरा डोस ४४ हजार, ७२८ इतके लसीकरण पूर्ण झाले आहे.  कागल तालुक्यात पहिला डोस ७० हजार ९९१ व दुसरा डोस १२,५५७ इतके लसीकरण पूर्ण झाले आहे. पॉझिटिव्हिटी रेट १५ टक्के  हा राज्याच्या व देशाच्या तुलनेत जास्तच आहे. त्यामुळेच मृत्यूमध्ये कोल्हापूर जिल्हा एक नंबरवर आहे‌. हॉटस्पॉट म्हणून घोषित गावांवर लक्ष केंद्रित करा. तिथे चाचण्यांसह सर्वेक्षण आणि उपचार मोहीमही जोरात राबवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. दोन महिन्यांचे मोफत धान्य वाटप पूर्ण होत आले असून सर्वच पेन्शनधारकांना दोन महिन्याची पेन्शन ॲडव्हान्स वाटप करण्याचे काम सुरू आहे. शेतीसाठी खते, बी-बियाणे व औषध पुरवठाही कमी पडणार नाही, असेही ते म्हणाले.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!