
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सह. दूध उत्पा. संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) सलग्न कृत्रिम रेतन सेवकांची आढावा मिटिंग संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात पार पडली.पशुसंवर्धनासाठी कृत्रिम रेतन सेवा व प्रथमोपचार काम करणाऱ्या पशुधन पर्यवक्षक विरोधात शासन कारवाईमुळे पशुधन पर्यवक्षक संपावर गेले. त्यामुळे या संपाचा परिणाम जनावरांच्या उपचार सुविधावर झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी गोकुळने पुढाकार घ्यावा.अशी मागणी गोकुळ सलग्न कृत्रिम रेतन सेवकांच्या वतीने करण्यात आली. त्याच बरोबर गोकुळ सलग्न कृत्रिम रेतन सेवकांच्या मानधनात वाढ करावी, रेतन सेवकांची आरोग्य विमा पॉलिसि संघाने करावी व संघाचे ओळखपत्र द्यावे, अश्या मागण्या यावेळी सर्व कृत्रिम रेतन सेवकांच्या वतीने मिटिंग मध्ये करण्यात आल्या.यावेळी बोलताना चेअरमन विश्वास पाटील म्हणाले की संघाच्या पशुसंवर्धन विभागातील कृत्रिम रेतन सेवा हा मुख्य भाग आहे. तसेच १९७८ पासून संघामार्फत प्रशिक्षण देवून कृत्रिम रेतन सेवा सुरु केली आहे. ४०६ कृत्रिम रेतन सेवक संघासाठी काम करत आहेत. कृत्रिम रेतन सेवकांनी संपात सहभागी न होता आपली सेवा चालू ठेवावी अशा सूचना देण्यात आल्या व कृत्रिम रेतन सेवकांना संघाचे ओळखपत्र, संघाचा लोगो असलेली बँग व जे प्राथमिक उपचारासाठी लागणारे औषधे काही प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यानां दिल्या आहेत.
Leave a Reply