जगदगुरू  नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना ४२ टन धान्यवाटप

 
कोल्हापूर/प्रतिनिधी :  श्रीक्षेत्र नानिजधाम येथील जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान यांच्या वतीने त्यांच्या कोल्हापूर जिल्हा सेवा समिती यांच्यामार्फत, कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा फटका बसलेल्या शिरोळ तालुक्यातील बस्तवाड, घालवाड, कुटवाड, दानोळी व कुरुंदवाड तसेच कोल्हापूर शहरात बापट कॅम्प, जाधववाडी, भोसलेवाडी, कुंभार गल्ली, कदमवाडी, सुतारमळा- फुलेवाडी आणि करवीर तालुक्यातील आंबेवाडी आणि पन्हाळा, भुदरगड, शाहुवाडी आणि गगनबावडा या तालुक्यातही धान्यवाटप करण्यात आले. या कीटचे वजन ३५ किलो असून यामध्ये २० किलो तांदूळ, ५ किलो गव्हाचे पीठ, २ किलो तुरडाळ, २ किलो बटाटे, २ किलो कांदे, खाद्य तेल १ पिशवी, तिखट २५० ग्रम, हळद, काडेपेटी, मेणबत्ती, मीठ ई वस्तूंचा प्रामुख्याने समावेश आहे. अशी १२०० जीवनावश्यक वस्तूंची कीट वाटप करण्यात आली.एकूण ४२ टन धान्याचे वाटप कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना करण्यात आले. कीटवाटपाचा कार्यक्रम गेल्या ८ दिवसापासून विविध ठिकाणी  चालू आहे. 
 महापूराने कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले होते, त्यामध्ये घरांचे आणि इतर संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते,घरे पाण्याखाली गेल्याने अनेक कुटुंबे उघद्यड्यावर होती, अतिशय अडचणीत असलेल्या या कुटुंबांना चारीतार्थासाठी तातडीने उपयोगी पडावे म्हणून संस्थानतर्फे या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, नेमक्या गरजूंपर्यंत हे वाटप झाल्याने त्यांच्यात समाधान व्यक्त होत आहे, त्यांना त्याचा मोठा आधार झाला असून कीट मिळालेल्या लाभार्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.
यापूर्वी महाड व चिपळूण येथेही पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची अशी कीट देण्यात आली आहेत, दोन्ही ठिकाणी मिळून संस्थानाच्या ८ हजार सेवाकार्त्यांनी स्वच्छता अभियान राबविले आणि तिथे अन्नादान सुद्धा करण्यात आले. 
 १५ ऑगस्ट रोजी बस्तवाड या गावी शेवटचा कार्यक्रम घेऊन या कीट वाटपाच्या कार्यक्रमाचा समारोप झाला, बस्तवाड हे पूर्णच गाव पाण्याखाली असलेमुळे येथे संस्थांनकडून एकूण ५०० कीट वाटप करण्यात आली.
या कार्यक्रमास माजी खासदार मा. श्री राजू शेट्टी हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते, त्याचबरोबर माजी आमदार श्री उल्हास पाटील, माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक, संस्थानचे विश्वस्त अभिजित अवसरे, जिल्हा निरीक्षक श्री मनोहर उर्फ आप्पा गुंड, कोल्हापूर जिल्हा सेवाध्यक्ष मोहन शहा, हिंदु संग्राम सेना पिठ विकास ब्रिगेडियर श्री दिलीप कोळी, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष आज-माजी पदाधिकारी, गुरुबंधु, गुरुभगिनी तसेच बस्तवाड सरपंच श्री प्रदीप चौगुले, उपसरपंच बाळासो कोळी, ग्रामविकास अधिकारी श्री विनायक शेवरे, सर्व सदस्य, गटप्रमुख जाफर पटेल, सुरेंद्र जंगम, साहेबलाल प्रोफेसर, राकेश कांबळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!