
कोल्हापूर/प्रतिनिधी:कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील ग्रामीण भागाबरोबरच शहराच्या उपनगरातील समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे , अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. साळोखेनगर परिसरातील विविध विकासकामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
साळोखेनगर येथील पार्वती गार्डन परिसरात आमदार ऋतुराज पाटील यांच्या आमदार निधीतून 10 लाख रुपये खर्चून सांस्कृतिक सभागृह बांधण्यात येणार आहे. तसेच 10 लाख रुपये खर्चून साळोखेनगर परिसरतील अंतर्गत गटर्स बांधली जाणार आहेत. या दोन्ही विकासकामाचा भूमिपूजन सोहळा आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी आमदार पाटील यांनी परिसरातील स्वामी समर्थ मंदिर सांस्कृतिक सभागृहाची पाहणी केली आणि या सभागृहाच्या डागडुजीसाठी निधी उपलबध करून देण्याचीही ग्वाही दिली.
यावेळी माजी नगरसेविका प्रतीक्षा पाटील, धीरज पाटील, माजी नगरसेवक उदय जाधव, रविंद्र राऊत, सुनिल शिपुगडे, आनंद साजने, रमेश पाटील, भिमराव देसाई, डॉ सुधाकर ढेकळे, संतोष जाधव, राजेंद्र पत्की, बापू सरनाईक, अनिल घाटगे, नारायण लळीत,अनिल केळुसकर, प्रा महेंद्र वाघमारे,अनिल साळोखे, आर एम पाटील, तानाजी वाघमारे, विष्णू वरेकर, बाबासो पाटील, प्रभाकर जाधव, संजय मगदूम, विनोद पाटील, अमित महाडिक,संजय पोतदार, राहुल सरनोबत, प्रशांत निगडे,श्रीकांत मोरे सर, अविनाश पाटील, रवि कुंभार, पुजा आरडे, अश्विनी मकोटे, सविता पाटील हे उपस्थित होते .आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत पार्वती गार्डन परिसरातील सांस्कृतिक हॉलचे भूमिपूजन झाले.
Leave a Reply