
कोल्हापूर/ प्रतिनिधी: शतक महोत्सवाकडे वाटचाल करणारी वैद्यकीय क्षेत्रातील शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने आयोजित वुमन्स डॉक्टर विंगच्या ११ व्या ‘ईव्ह कॉन’ या दोन दिवसीय राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेस आज हॉटेल सयाजी येथे प्रारंभ झाला. परिषेदेचे उद्घाटन आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ.रवी वानखेडकर आणि सचिव डॉ. रामकृष्ण लोंढे यांच्या हस्ते झाले.
त्यांनतर उद्घाटनपर आपल्या भाषणात इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.रवी वानखेडकर म्हणाले ” आज मेडिकल कॉलेजमध्ये पन्नास टक्के महिला प्रवेश घेतात. वैद्यकीय क्षेत्रात एखाद्या व्यक्तीला बरं करणे हे मोठे आव्हान असते. या क्षेत्रामध्ये टिकण्यासाठी मानसिक धैर्य व चिकाटीची गरज असते.ही चिकाटी आणि काम करण्याची क्षमता महिलांकडे अधिक प्रमाणात आहे. किचकट व वेळखाऊ शस्त्रक्रिया असोत किंवा वैद्यकीय क्षेत्रात होणारे रोज नवनवीन संशोधन असोत, उच्चशिक्षीत महिला डॉक्टरांनी यात प्राविण्य मिळवत हे आव्हान स्विकारले आहे.यासाठी ‘वुमन्स डॉक्टर विंग’ ही संकल्पना आणली आहे.महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ईव्ह कॉन’ चे राज्यभरात आयोजन येते.
“स्त्रियांचे अनेक आजार असतात. ज्या ते उघडपणे सांगू शकत नाहीत. पण डॉक्टर जर एखादी स्त्री असेल तर त्या खुलेपणाने बोलू शकतात. आयएमएने स्त्री-पुरुष असा कोणताही भेद न करता महिला डॉक्टर्सना नेहमीच प्राधान्य दिले आहे. ही महिला डॉक्टरची मजबूत टीम आणि त्यातील एकएक स्त्री रोग तज्ञ असोसिएशनच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातून स्त्रियांच्या आजाराचे व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.
असा विश्वास महाराष्ट्र राज्य वुमन्स डॉक्टर विंगच्या अध्यक्षा तसेच कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा व परिषदेच्या अध्यक्षा डॉ. आशा जाधव यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात व्यक्त केला.
अश्या प्रकारच्या वैद्यकीय परिषदांच्या माध्यमातून वैद्यकीय स्त्रीला आपले हक्क,अधिकार आणि कर्तव्ये तसेच कायदेविषयक, वैद्यकीय क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान यांची माहिती व्हावी याकरिता या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.म्हणून “डॉक्टर वुमन टुडे अँड टूमारो” अशी संकल्पना या परिषदेची आहे.असा परिषेदेचा उद्देश परिषेदेचे संघटक डॉ. अशोक जाधव यांनी विशद केला.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘नारीशक्ती आणि देशभक्ती’ या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.सूत्रसंचालन डॉ. अमर आडके यांनी केले.तर आभार डॉ. किरण दोशी यांनी मानले.यावेळी मेडिकल असोसिएशनच्या फ्लॅश यानियतकालिकेचे प्रकाशन करण्यात आले.या दृक्श्राव्य परिषदेस आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ.रवी वानखेडकर डॉ.रामकृष्ण लोंढे, महाराष्ट्र राज्य आयएमएचे सचिव डॉ. पंकज बंदरकर, डॉ. राजीव अग्रवाल,परिषदेच्या संघटक सचिव डॉ.गीता पिल्लई,डॉ. विद्युत शहा,कोल्हापूर विंगच्या अध्यक्षा डॉ. नीता नरके, सहसचिव डॉ. ए. बी.पाटील,डॉ.उन्नती सबनीस, डॉ.शैलेश कोरे,डॉ.रविंद्र शिंदे,डॉ. आबासाहेब शिर्के,डॉ. अरुण धुमाळे,डॉ.राजेंद्र वायचळ,डॉ. पी एम.चौगुले, डॉ.देवेंद्र जाधव यांच्यासह दोनशेहून अधिक तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.
Leave a Reply