
कोल्हापूर: महानगरपालिकेची हद्दवाढ व्हावी, अशी अनेक वर्षांची रास्त मागणी असून, त्याखेरीज शहराचा विकास खुंटला जातं आहे. हद्दवाढ साठी आपण सभागृहात विविध आयुधांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करून चर्चा घडवून आणली आहे. प्रसंगी हद्दवाढ व्हावी या मागणी साठी विधानसभेच्या पायऱ्यांवर उपोषण केले आहे. त्यामुळे हद्दवाढ साठी सुरु असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व आपण करावे, अशी मागणी हद्दवाढ कृती समितीच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन केली..
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, हद्दवाढ व्हावी ही मागणी रास्त असून, यासाठी नगरविकास मंत्री नाम. श्री. एकनाथ शिंदे साहेब सकारात्मक आहेत. त्यामुळे लवकरच या प्रश्नी मा.नगरविकास मंत्री यांच्या माध्यमातून लवकरच मंत्रालय स्तरावर बैठक लावू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी कृती समिती सदस्यांना दिली.
यावेळी श्री. आर. के. पवार, बाबा इंदुलकर, जयकुमार शिंदे, सुभाष देसाई, किशोर घाटगे, स्वप्नील पार्टे आदी उपस्थित होते.
Leave a Reply