रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी नगरविकास विभागाकडून रु.९ कोटी ८४ लाखांचा निधी

 

कोल्हापूर : शिवसेना नेते व महाराष्ट्र राज्यांचे नगरविकासमंत्री नाम.एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. शहराचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतली असून, शहराचा विकास शिवसेना करून दाखवेल असे प्रतिपादन त्यांनी या दौऱ्यात केले. यासह तातडीने ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या परिपूर्ण विकासासाठी आणि सुशोभीकरणासाठी रु.९ कोटी ८४ लाखांचा निधी त्यांनी नगरविकास विभागामार्फत मंजूर केला, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली पत्रकार परिषदेत दिली.
नगरविकास मंत्री नाम.एकनाथ शिंदे साहेब यांचा आज कोल्हापूर दौरा पार पडला. या दौऱ्यात वडगाव येथील हेलिपॅडवर आगमन झाल्यानंतर हद्दवाढ कृती समितीची बैठक घडवून आणली. या बैठकीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ व्हावी, हद्दवाढीखेरीज शहराचा विकास खुंटला असून, त्याचे गांभीर्य या बैठकीत आपण व्यक्त केले. याबाबत बोलताना नगरविकास मंत्री नाम.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी, हद्दवाढीबाबत शासन सकारात्मक असून, कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ व्हावी यासाठी येत्या दिवाळीनंतर मंत्रालय स्तरावर बैठक घेण्याची ग्वाही दिली.
यानंतर नगरविकास मंत्री नाम.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते कै.बळवंतराव अर्जोजीराव यादव (आबा) यांच्या पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण नगरपालिका चौक, पेठ वडगांव येथे पार पडले, यानंतर कोल्हापूर शहरातील शाहूकालीन सुबराव गवळी तालीम या संस्थेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन, पायाभरणी समारंभ नगरविकास मंत्री नाम.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते पार पडले. तर तालीम संस्थेच्या कोनशिलेचे अनावरण शिवसेना संपर्कप्रमुख श्री.अरुणभाई दुधवडकर यांच्या हस्ते पार पडले. यानंतर शिवसेनेचे नूतन शहर प्रमुख श्री.जयवंत हारुगले यांच्या “सिंहगड” शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नगरविकास मंत्री नाम.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते पार पडले.
या दौऱ्यामध्ये नगरविकास मंत्री नाम.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी, कोणतेही संकट असो, शिवसेना मदतकार्यात सर्वात पुढे असते. त्यामुळे शिवसेनेकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख नाम.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर शहराचा सुनियोजित विकास करण्यास शिवसेना कटिबद्ध असल्याचे सांगितले. शहराच्या विकासाबाबतीत नगरविकास विभागाच्या मार्फत कोट्यावधींचा निधी देण्याची संधी प्राप्त झाली असून, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या मागणी प्रमाणे निधी मंजुरी होत आहे. नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा द्याव्यात, यासाठी शिवसेनेचा प्रयत्न असून कोल्हापूर शहरातील नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा देण्याचे काम मुख्यमंत्री नाम.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून आम्ही करू, अशी ग्वाही दिली.
ऐतिहासिक रंकाळा तलावाचे सुशोभिकरण व्हावे, अशी नागरिकांची मागणी असून, रंकाळा तलावाचा विकास करण्याची ग्वाही शिवसेनेने दिली होती. त्यानुसार रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील “रंकाळा परिसर विकसित, जतन व संवर्धन करणे” यासाठी महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांचा विकास” या योजनेंतर्गत रु.१५ कोटी मंजूर करून सदर कामाकरिता पहिला टप्पा म्हणून रु.९ कोटी ८४ लाख इतका निधी आज शासन निर्णयाद्वारे वितरीत करण्यात आला आहे.
पुढील काळातही शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री नाम.मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब, नगरविकास मंत्री नाम.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहराचा विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. रंकाळा तलावास पहिल्या टप्प्यात रु.९ कोटी ८४ लाख निधी मंजूर करण्यास आम्हाला यश आले आहे. पुढच्या काळात महानगरपालिकेची हद्दवाढ, थेट पाईपलाईन, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास, वाहतुकीच्या दृष्टीने रिंग रोड, भुयारी मार्ग, उड्डाणपूल, स्काय वॉक आदींची निर्मिती करण्यास प्रयत्नशील असणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
यावेळी शहरप्रमुख जयवंत हारुगले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, माजी नगरसेवक राजू हुंबे, युवानेते ऋतुराज क्षीरसागर, माजी जिल्हाप्रमुख रवीभाऊ चौगुले, किशोर घाटगे, सुनील जाधव, तुकाराम साळोखे, रघुनाथ टिपुगडे, अभिषेक देवणे, निलेश हंकारे, रियाज बागवान, कपिल सरनाईक, पियुष चव्हाण आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!