परीक्षा संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्थानिक भाषांमध्ये #ExamBuddy&nbsp मोहीम कु वर

 

विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित तणाव आणि चिंता यांवर नियंत्रण ठेवण्यात मदत करण्यासाठी ‘कू’एक खास उपक्रम घेऊन येतो आहे. भारताचा बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ‘कू’ ने ‘फोर्टिस नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम, फोर्टिस हेल्थकेअर’ यांच्या सहकार्याने हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. खास विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी या तीन दिवसीय संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले असून दिनांक 26 ते 29 नोव्हेंबर 2021 या काळात रात्री 8:00 ते 9:00 या वेळेत होणार आहे. ‘फोर्टिस हेल्थकेअर’चे डायरेक्टर – फोर्टिस नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्रॅम, डॉ. समीर पारीख यांच्या मार्गदर्शनाखाली मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांच्या तज्ञ टीमद्वारे लाइव्ह सत्रे आणि ‘आस्क मी एनीथिंग’ हे कार्यक्रम अनेक भारतीय भाषांमध्ये आयोजित केले जातील. मानसिक आरोग्यतज्ञांची टीम दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांपूर्वी परीक्षेशी संबंधित कौशल्ये विकसित करण्याबरोबरच अभ्यास कौशल्ये कशी विकसित करावीत हे सांगेल. परीक्षांशी संबंधित तणावाचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल आवश्यक माहिती आणि सर्व प्रकारचे सहकार्य प्रदान करेल.
#ExamBuddy नावाची ही मोहिम हिंदी, तेलुगु, तमिळ, गुजराती, मराठी, बंगाली आणि कन्नड – विविध भाषांमध्ये उपलब्ध असेल आणि देशभरातील ‘कू’ यूजर्सना त्याचा फायदा होईल. मेड-इन-इंडिया प्लॅटफॉर्म कू चे यूजर्स – फोर्टिसच्या तज्ञांशी संलग्न होऊन बोर्ड परीक्षेआधी आणि दरम्यान तणाव प्रभावीपणे हाताळण्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती मिळवतील. ‘कू’ ॲप  Google Meet द्वारे परस्परसंवादाची सोय करेल.
या मोहिमेविषयी तसेच परीक्षेशी संबंधित ताणतणावांशी प्रभावीपणे मुकाबला करण्याची नितांत गरज यावर बोलताना ‘कू’ॲपच्या प्रवक्त्याने सांगितले, “Koo एक नाविन्यपूर्ण मंच आहे. विविध स्थानिक भारतीय भाषांमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर लोकांनी संवाद करावा यासाठी ‘कू’ त्यांना प्रोत्साहित करते. परीक्षेचा ताण ही जवळजवळ प्रत्येक विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यासाठी मोठीच समस्या असते. अशावेळी स्थानिक भाषांमधील तज्ञांशी केलेले फ्रीव्हीलिंग चॅट विद्यार्थ्यांसह पालकांनाही त्यांच्या तणावाची पातळी अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यास मदत करू शकते. आम्हाला खात्री आहे, की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आनंदी भारत घडवण्यात मदत करू शकतो. सोबतच हा मंच तणाव व्यवस्थापनासह परीक्षेच्या ताणाशी लढा देण्यासाठी ज्ञानाची देवाणघेवाण करताना महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
फोर्टिस हेल्थकेअरच्या फोर्टिस नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्रॅमचे संचालक-डॉ. समीर पारीख म्हणाले, “दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि त्यांचे पालक परीक्षेच्या दबावामुळे तणावाखाली असतात. अशावेळी संवादातून एखाद्याला काय वाटते यावर चर्चा करणे आणि व्यक्त होणे केव्हाही चांगले. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना शास्त्रीय आधार असलेली योग्य साधने आणि कौशल्ये उपलब्ध करून देणे, त्यांना तणाव हाताळण्यासाठी सक्षम करणे आणि संतुलित काम करण्यास मदत करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी जीवन कौशल्ये शिकण्याचे माध्यम म्हणून पाहणे अत्यंत आवश्यक आहे. ती केवळ गुण मिळवण्याची यंत्रणा नाही.”
‘कू’विषयी:
‘कू’ची स्थापना मार्च 2020 मध्ये भारतीय भाषांमध्ये बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून झाली. अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध, ‘कू’ विविध क्षेत्रांतील भारतीय लोकांना त्यांच्या मातृभाषेत व्यक्त होण्याचा सोपा मार्ग मिळवून देते. ज्या देशातील फक्त १०% लोक इंग्रजी बोलतात, तिथे अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची खूप गरज आहे जे भारतीय युजर्सना त्यांच्या भाषेतला अस्सल अनुभव देऊ शकेल, त्यांना एकमेकांशी जोडून ठेवेल. भारतीय भाषांमध्ये संवाद साधायला प्राधान्य देणाऱ्या भारतीयांच्या आवाजासाठी ‘कू’ एक मंच मिळवून देतो.
फोर्टिस राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम, फोर्टिस हेल्थकेअर बद्दल:
‘फोर्टिस हेल्थकेअर’ चा फोर्टिस नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम ही एकात्मिक मानसिक आरोग्य सेवाव्यवस्था आहे. यात मानसोपचारतज्ज्ञ, क्लिनिकल आणि समुपदेशक मानसशास्त्रज्ञ, कला आणि हालचालआधारित थेरपिस्ट्स, सायको-ऑन्कॉलॉजिस्ट, मानसोपचारतज्ञ, सायकोडायनामिक सायकोथेरपिस्ट्स, ऑर्गनायजेशनल बिहेवियरल सायकॉलॉजिस्ट्स आणि क्रीडा मानसशास्त्रज्ञांचा समावेश आहे. ‘फोर्टिस नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम’चे संचालक डॉ. समीर पारीख यांच्या नेतृत्वाखाली चालणारा हा जागतिक, व्यापक आरोग्य कार्यक्रमांपैकी एक असा कार्यक्रम आहे. हा दिल्ली-एनसीआर, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, मधील 24 केंद्रांमध्ये चालवला जातो. कोलकत्ता, मोहाली, लुधियाना, अमृतसर आणि जयपूर या ठिकाणी  प्रतिबंधात्मक आणि सकारात्मक मानसिक आरोग्यावर मुख्य लक्ष केंद्रित करून, विभाग फोर्टिस स्कूल मानसिक आरोग्य कार्यक्रम चालवतो, जो शाळांसाठी पूर्णपणे विनामूल्य आहे.
फोर्टिस स्ट्रेस हेल्पलाइन (8376804102) ही मानसिक आरोग्य व्यावसायिकांच्या बहुभाषिक टीमद्वारे चालवली जाणारी 24 X 7 हेल्पलाइन आहे ज्यामुळे भावनिक त्रास होत असलेल्या व्यक्तींना आधार दिला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!