
कोल्हापूर/प्रतिनिधी: राजेरजवाड्यांना पिठाच्या उदरनिर्वाहासाठी दिलेल्या जमिनींचे पिठाच्या वतीने जतन केले जात असून प्रत्यक्ष त्या जमिनी कसण्यासाठी शेतकऱ्यांकडेच आहेत अशी माहिती जगद्गुरु विद्या नरसिंह भारती यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले, श्री स्वामी जगद्गुरु शंकराचार्य पीठ ट्रस्टच्या जमिनी ताब्यात घेण्याबाबत जिल्हा प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. ती तत्काळ स्थगित करावी, अशी मागणी काही शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. त्या अनुषंगाने स्वामीजी बोलत होते. स्वामीजी म्हणाले २०२० मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार देशभरातील देवस्थानच्या जमिनी देवस्थान कडेच राहतील. त्यात निर्णयाची अंमलबजावणी स्थानिक जिल्हा प्रशासन करत आहे.
कायदा आणि प्रशासनाने सांगड घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे पीठ वाटचाल करीत आहे. पिठाचा एकूण कारभार चालवण्यासाठी शाहू महाराजांनी जमिनी दिल्या. त्यातून मिळणाऱ्या खंडातून पिठाचा खर्च चालत आहे.पिठाच्या नावे असणाऱ्या प्रत्यक्ष स्वरूपात असणाऱ्या जमिनी शेतकऱ्यांकडे कसण्यासाठी आहेत. त्या मोबदल्यात त्यांच्याकडून पिठाला खंड मिळतो.पण वर्षानुवर्ष हे चालले असताना काही शेतकरी मात्र इतर शेतकऱ्यांना चुकीचा सल्ला देत आहेत. या सर्व जमिनी खासगी मालकीच्या आहेत. त्या देवस्थान इनाम नाहीत पिठाच्या जमिनीवरील हक्क नसल्याचे सांगून दिशाभूल करीत आहेत. शेतकऱ्यांकडे कित्येक वर्षापासून कसण्यास असलेल्या जमिनीवर कागदोपत्री नोंद जरी पिठाची असली तरी त्या कसायला आपल्याकडेच राहतील. त्याचा प्रशासनाने ठरवून दिलेला खंड भरावा आणि आपले नाते कौटुंबिक राहावे असे, आवाहन स्वामीजींनी शेतकऱ्यांना केले. पिठाच्या स्थापनेपासून कित्येक शेतकऱ्यांकडे जमिनी आहेत. त्या ते अगदी चांगल्या पद्धतीने कसून खंड पीठास देत आहेत.पण काही शेतकरी हे चुकीचे आहे. असे सांगून इतर शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. त्यांना बळी पडू नये. असे शिवस्वरूप भेंडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत ऍड. सुरेश कुलकर्णी यांच्यासह पीठाचे कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply