
कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व सामान्य, गोर-गरीब लोकांचा आधारवड असणारा दवाखाना, जिल्ह्याची आरोग्य वाहिनी म्हणून छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल (सी.पी.आर) ओळखले जाते. परंतु याठिकाणी असणाऱ्या समस्या सुरु असणारा सावळा गोंधळ पाहता याठिकाणची असणारी परिस्थिती राम भरोसे असल्याचे चित्र आहे. नुकतीच वैद्यकीय शिक्षण विभागाकडून सी.पी.आर मधील डॉक्टरांना चौथ्यांदा सिधुदुर्गला प्रतिनियुक्तीवर हजर होण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. सर्वांचा परिणाम याठिकाणी उपचार घेणाऱ्या गरीब, गरजू पेशंटना व त्यांच्या नातेवाइकांना सहन करावा लागत आहे. याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने सी.पी.आर अधिष्ठाता कार्यालया समोर निदर्शने करून अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांना निवेदन देण्यात आले.
सी.पी.आर मधील ४० डॉक्टरांना रिलीव्ह करू नये, सिंधुदुर्गसाठी कोल्हापूरचे डॉक्टर वगळून अन्य नवीन डॉक्टरांची नियुक्ती करावी व सर्व सामन्यांचे आधारवड असलेले सी.पी.आर हे हॉस्पिटल वाचवावे अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी वाचवा वाचवा सी.पी.आर वाचवा, उद्धव सरकार हाय हाय, तिघाडी सरकार हाय हाय, सर्व सामान्य जनतेला मरणाच्या खाईत लोटणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी डॉक्टरांच्या सिंधुर्गातील प्रतीनियुक्तीतील राजकारण दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी विशेष करून आरोग्य राज्यमंत्र्यांनी यात लक्ष घालायचे सोडून केवळ निवडणुका लढवण्यातच धन्यता मानली, याबाबत त्यांचा निषेध केला व आरोग्य राज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. “राजकारण संपले असेल तर निवडणुकांसाठी घेतल्या प्रमाणे मॅरेथोन बैठका घेऊन सामान्य गोर गरीब जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या सी.पी.आर च्या कामकाजात थोडे लक्ष घालावे” असे ते म्हणाले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस विजय जाधव म्हणाले, “सर्वसामान्य जनतेचे आधारवड असलेले सी.पी.आर हे एकमेव हॉस्पिटल आहे. गेल्या अडीच वर्षामध्ये कोरोनाच्या काळात ज्या डॉक्टरांनी अमूल्य अशी सेवा बजावली अशा डॉक्टरांना गेली पाच महिने पगार मिळालेला नाही, त्याच बरोबर चाळीस डॉक्टर हे कोरोना बाधित झाले आहेत. तसेच चाळीस डॉक्टर हे प्रतीनियुक्तीवर टाकण्यात आले त्यामध्ये बालरोग तज्ञ, काननाक, घसा तज्ञ, सर्जन अशा अनेक डॉक्टरांचा समावेश आहे.” त्याचबरोबर भाजपचे सरकार असताना आम. चंद्रकांतदादा पाटील यांनी पालकमंत्री असताना सी.पी.आर सुसज्य व्हावे यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला, पण हे महाविकास आघाडी सरकार सी.पी.आर बंद कसे पडले ह्याच्या मागे लागले असल्याचे दिसून येत आहे असा आरोप त्यांनी केला.
तसेच सरचिटणीस गणेश देसाई, हेमंत आराध्ये यांनी आपल्या भाषणात सरकारचा निषेध करून प्रत्यक्ष आरोग्य राज्यमंत्री कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना न पाळता निवडणुकीचा गुलाल खेळतात हि बाब लांछनास्पद असल्याचे नमूद केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, राजू मोरे, भाजपा प्रवक्ते अजित ठाणेकर, मंडल अध्यक्ष विवेक कुलकर्णी, भरत काळे, अतुल चव्हाण, अभिजित शिंदे, ओमकार खराडे, महेश यादव, संदीप कुंभार, धीरज पाटील, दिलीप बोंद्रे, विशाल शिराळकर, गणेश चिले, इक्बाल हकीम, विवेक वोरा, विजय खाडे-पाटील, प्रसाद पाटोळे, अनिकेत मुतगी, शाहरुख गडवाले ई. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
कृपया प्रसिद्धीसाठी, आपला
मा.संपादकसो, शंतनू मोहिते
दै. भाजपा कार्यालय प्रमुख
Leave a Reply