
पुणे: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) नावीन्यपूर्ण संशोधनासाठी विद्यापीठाला आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या मदत करत असते. विद्यापीठ तंत्रज्ञानातील संशोधन क्षेत्रात महत्त्वाची भूमिका ऩिभवतात. विद्यापीठाने पायाभूत सुविधा मजबूत करून विविध क्षेत्रात सखोल संशोधनासाठी प्रोत्साहन द्यावे, तरच भारत तंत्रज्ञानात जगाचे नेतृत्व करेल. विद्यापीठ ही संशोधन आणि नवनिर्मितीचे इंजिन असते, अशी भावना संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) चे चेअरमन डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी व्यक्त केली.एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या चौथ्या पदवी प्रदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी राज्यसभेचे सदस्य श्री. प्रशांता नंदा, भुवनेश्वरच्या खासदार अपराजिता सारंगी, परिवहन मंत्री अनिल परब, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, डॉ. सुचिता नागरे-कराड, डॉ. सुनीता कराड, प्रा. ज्योती कराड-ढाकणे, वैज्ञानिक विजय दास, प्र- कुलगुरू डॉ. अऩंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख आदी उपस्थित होते.
एमआयटी एडीटी विद्यापीठातर्फे 2020-21 या शैक्षणिक वर्षात एकूण 2205 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. त्यात 13 विविध विद्याशाखेतील 44 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान केले. तसेच 8 विद्यार्थ्यांना पीएच.डी प्रदान केली. त्याच प्रमाणाने विद्यापीठाने राज्यसभेचे सदस्य श्री. प्रशांता नंदा यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. तसेच खासदार श्रीमती अपराजिता सारंगी यांना श्री सरस्वती देवी जीवन ज्ञान गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.ऑनलाईनद्वारे बोलताना डीआरडीओचे चेअरमन डॉ. जी. सतीश रेड्डी म्हणाले, भारताकडे सर्वात शक्तिशाली संरक्षण यंत्रणा असून जगात अत्याधुनिक सशस्त्र-अस्त्र असणाऱ्या देशात भारताचा समावेश होतो. तंत्रज्ञानामध्ये देशाने जगाचे नेतृत्व करावे. विद्यापीठ तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका निभवतात. विद्यापीठ, डीआरडीओ आणि सरकार एकत्र येत संशोधन व नवनिर्मितीचे वातावरण निर्माण करावे लागेल. विद्यार्थ्यांकडे चांगली कल्पना, डिझाईऩ व संरक्षण उत्पादन निर्मातीसाठी नवे तंत्रज्ञान असल्यास डीआरडीओ 10 कोटी निधी देत आहे. डीआरडीओ 300 पेक्षा अधिक शैक्षणिक संस्थांसोबत तंत्रज्ञानावर आधारित संशोधनावर काम करत आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना घेऊन पुढे यावे.प्रशांता नंदा म्हणाले, विद्यार्थ्यांवर देशाची जबाबदारी आहे. मेहनत करून भविष्याची पायाभरणी करावी. आपले धैय ओळखून मेहनत केल्यास यश संपादन होईल.अपराजिता सारंगी म्हणाल्या, एक भारत, श्रेष्ठ भारताचा प्रतिक म्हणून हे घुमट नावारुपाला येईल. शिक्षणाची परिभाषा सर्वांनी आत्मसात करावे. विज्ञान आणि आध्यात्मातून विश्वशांती हा या विद्यापीठाचा विचार आहे. येथून बाहेर पडणारे विद्यार्थी जगाला शांतीचा संदेश देतील. समन्वय, संवाद, संयम, संतुलन, विनम्रता, सकारात्मकता आणि सेवाभाव ही मुल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी.अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, पदवीधरांनी परंपरेचे पालन न करता सर्जनशीलतेने विचार करण्याचा आणि नवीन शोध घ्यावा. बुद्धीसह आत्मा आणि मनाचे संतुलन करून भारतीय संस्कृतीचे प्रसार करावे.प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, येथे संशोधन आणि उद्योजक पिढी घडविण्यावर भर दिला जातो. भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन करण्यासाठी विद्यापीठ महत्वाची भूमिका बजावेल.प्रा.स्नेहा वाघटकर, प्रा. स्वप्निल सिरसाठ आणि डॉ. अशोक घुगे यांनी सूत्रसंचालन केले. प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव यांनी आभार प्रदर्शन केले.
Leave a Reply