
कोल्हापूर : दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे वाचाळवीर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे यशस्वी सक्षम पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने नाना पटोले यांचा बिंदू चौक येथे तीव्र निषेध करण्यात आला. देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, नाना पटोले कोण रे पायतान मारा दोन रे, नाना पटोलेच करायचं काय खाली डोक वर पाय, मुर्दाबाद मुर्दाबाद नाना पटोले मुर्दाबाद, कॉंग्रेसचा धिक्कार असो, नाना पटोले यांना अटक झालीच पाहिजे अशा घोषणा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी देत पुतळ्याचे दहन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले संपूर्ण जगभरात भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे आपल्या नेतृत्व गुणांमुळे ओळखले जातात. परंतु गेली अनेक वर्षे देशाला लुटणाऱ्या काँग्रेसच्या राज्यकर्त्यांमध्ये नरेंद्रजी मोदी यांच्या बद्दल असूया आणि द्वेषाची भावना प्रत्येक गोष्टीतून दिसून येते. याचे ज्वलंत उदाहरण घ्यायचे झाले तर नुकताच पंजाब मधील नरेंद्रजी मोदी यांच्या दौऱ्यामध्ये सुरक्षेमध्ये झालेली गंभीर चूक. पंजाब दौऱ्याप्रसंगी पंजाब पोलीस आणि प्रशासनाचे काँग्रेस हायकमांड यांना रिपोर्टिंग आणि दोन दिवसापूर्वी नाना पटोले यांनी केलेले पंतप्रधान यांच्या बद्दल हे वक्तव्य गंभीर असून संपूर्ण कॉंग्रेस पक्ष हा एक मार्गी नरेंद्रजी मोदी यांना रोखण्यात, त्यांच्या जीवाला धोका पोहोचवण्यात कामाला लागला आहे काय अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी केलेल्या या गंभीर विधानाबद्दल त्यांना तात्काळ अटक करावी आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जीवाला धोका पोचण्याच्या संदर्भातील वक्तव्याबद्दल त्यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही करत असल्याचे सांगितले.
Leave a Reply