के.एम.टी.कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावू : राजेश क्षीरसागर

 

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट असूनही नागरिकांना सुविधा मिळावी या हेतूने के.एम.टी. सेवा प्रशासनामार्फत अविरत सुरु ठेवण्यात आली आहे. त्याचा आर्थिक बोजा महानगरपालिका प्रशासनावर पडत असल्याने के.एम.टी.च्या उत्पन्न वाढीचे प्रयत्न होवून, इलेक्ट्रिक बसेस, तेजस्विनी योजना आदी माध्यमातून के.एम.टी. विभागास उर्जितावस्था आणण्यासाठी के.एम.टी.ला विशेष अनुदान मिळवून देण्याकरिता प्रयत्नशील आहे. के.एम.टी कर्मचाऱ्यांच्या मागण्याही रास्त असून, के.एम.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात प्रशासन सकारात्मक असून , कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष.राजेश क्षीरसागर यांनी केले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रम के.एम.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिका येथे आमरण उपोषण करण्यात आले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी या कर्मचाऱ्यांची भेट घेवून चर्चा केली.राजेश क्षीरसागर यांच्या यशस्वी शिष्टाईने कर्मचाऱ्यानी आमरण उपोषण सोडले. केली.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष .राजेश क्षीरसागर यांनी, पर्यावरण मंत्री.आदित्य ठाकरे साहेबांनी इलेक्ट्रिक वाहने वापरण्याबाबत अद्यादेश जारी केले आहेत. सद्या कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाची आर्थिक स्थिती आणि वाढते इंधन दर पाहता इलेक्ट्रिक बसेस वापरणे फायदेशीर ठरणार आहे. याकरिता आवश्यक प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करावा. पर्यटन व पर्यावरण मंत्री.आदित्य ठाकरे साहेबाकडून कोल्हापूर शहरास अशा इलेक्ट्रिक बसेस अनुदान स्वरूपात देण्याकरिता तात्काळ पाठपुरावा सुरु आहे. तेजस्विनी योजनेचा लाभ कोल्हापूर महानगरपालिकेस मिळण्यासाठी विशेष बाब म्हणून मंजुरी साठीही प्रयत्न केले जात आहेत. सी.एन.जी. वर चालणाऱ्या बसेस खरेदी करून वापरण्यासाठी नियमात शिथिलता आणण्याबाबत संबधित विभागाकडे विशेष पाठपुरावा करण्यात येणार आहे. याकरिता आवश्यक सर्व प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तात्काळ सादर करावेत, अशा सूचना महापालिका प्रशासकांना देण्यात आल्या आहे. एकूणच के.एम.टी. चे उत्पन वाढून के.एम.टी.सेवेस उर्जितावस्था देण्याचा प्रयत्न केला जात असताना, कर्मचारी वर्गाच्या प्रश्ना संदर्भातही गेल्या तीन दिवसांपूर्वी महानगरपालिका प्रशासक यांच्यासोबत बैठक पार पडली आहे. कर्मचाऱ्यांचा रोस्टर, सेवा निवृत्ती वेतन, फिटर बी कर्मचाऱ्यांची उर्वरित रक्कम, सेवा जेष्ठते प्रमाणे कामाचे नियोजन आदी मनपा स्तरावरील प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासह के.एम.टी. कर्मचाऱ्याना इतर मनपा कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे ७ वा वेतन आयोगाचा लाभ देण्याबाबत अभ्यास करावा. त्याकरिता आवश्यक विशेष अनुदान देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, तसेच गेली अनेक वर्षे रोजंदारीवर काम करणाऱ्यां के.एम.टी.कर्मचाऱ्याना सेवेत कायम करणेबाबत शासनाकडे यशस्वी पाठपुरावा करू, असे उपोषणकर्त्या के.एम.टी.कर्मचाऱ्याना आश्वासित केले.
यानंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते उपोषणकर्त्या के.एम.टी.कर्मचाऱ्यानी उपोषण सोडले.
यावेळी मारुती कांबळे, जितेंद्र संकपाळ, उत्तम कांबळे, दत्तात्रय बामणेकर आदी के.एम.टी. चालक, वाहक, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!