
कोल्हापूर : अवघे समाज जीवन आता कोरोना ची मरगळ दूर करत गतिमान होत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या मेडिकल टुरिझम विश्वाला गतिमानता देण्यात अपेक्स नर्सिंग होम ने भरारी घेतली आहे.. प्रतिथयश अस्थिविकारतज्ज्ञ डॉ उमेश जैन यांनी ‘मारिया’यांच्यावर कोल्हापुरातील अपेक्स हॉस्पिटल मध्ये ७ मार्च ला यशस्वी शस्त्रक्रिया केली ‘मारिया’ साऊथ अमेरिकेतील कोलंबिया देशातील निवासी. संधिवातामुळे सांधे झिजल्याने मारियांना खूप त्रास सहन करावा लागत होता. बसने, उठणे, चालणे, फिरणे, मांडी घालणे सर्वच हालचालींसाठी जीवघेण्या वेदना, थकवा, असह्य त्रास त्यांना जाणवत होता.
२०१९ साली कोव्हिडच्या बहरापुर्वी मारिया यांचे स्नेही सुनील पटेल यांनी “डॉ उमेश जैन यांच्याशी या संदर्भात जरूर सल्लामसलत करावी” असे सांगितले. मारिया यांनी डॉ जैन यांच्याशी टेलिमेडिसिन द्वारा स्वतःच्या दुखण्याबाबत चर्चा सुरु केली. दुबईतील त्यांच्या मुलीकडे असताना त्रास वाढत गेला. एक्सरेज आणि ट्रीटमेंट रिपोर्ट यांच्या अभ्यासानंतर डॉ जैन यांनी मारियांना प्रत्यक्ष तपासणीसाठी कोल्हापुरात येण्याविषयी सुचवले. याकाळात मारियाने आणि दंतवैद्यक असलेल्या त्यांच्या मुलीने बारीकसारीक शंका, मनातील प्रश्न डॉ जैन यांच्याशी बोलून विचार पक्का केला कि आपण शस्त्रक्रिया करूनच घ्यायची, यापूर्वी मारिया भारतात मुंबई, गोवा येथे भ्रमंतीसाठी आल्या होत्या. पण खुबारोपण शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र – कोल्हापूर येथील अपेक्स हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला देश, भाषा, संस्कृती सारेच भिन्न असणारे अपरिचित कोल्हापूर, कोणीही स्वदेशी नाही, त्यामुळे त्यांच्या मनात भीती, साशंकता होतिच, परंतु डॉ जैन यांनी अत्यंत आस्थेने व मनापासून धीर दिला व मायलेकींना निर्धास्त केले. त्यांची सर्व वैद्यकीय पाहणी आणि तपासणी केल्यानंतर ऑपरेशन ३ तास चालले. प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ संदीप कदम हे सहयोगी डॉक्टर होते. कमरेखाली भूल, एका कुशीवर झोपलेला पेशंट, कानावर पडणारे बारीकसारीक आवाज त्यामुळे येत असणारे नैराश्य, अस्वस्थता यावर मात करण्यासाठी डॉ कदम यांनी “रामकृष्ण हरी” हा मंत्र मोबाईलवर लावून ठेवला. मारिया त्या मंत्राच्या प्रभावी लहरींमध्ये साऱ्या वेदना विसरून गेली. डॉक्टरना शस्त्रक्रियेच्या वेळी अत्यंत सहकार्य केले! शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
शास्त्रक्रियेनंतरचे दिवस अत्यंत महत्वाचे. जंतुसंसर्ग होऊ नये, ड्रेसिंग स्वच्छता, देखभाल, आहार याबाबत खूपच काटेकोरपणे काळजी घेतली घेतली. समाधानाची गोष्ट हि कि ८ दिवसांत मारिया या स्वतःहून हिंडणे, फिरणे, काही काळ उभे राहणे व दैनंदिन व्यवहार समर्थपणे पार पडू लागल्या. काळजी घेणाऱ्या सर्व स्टाफबद्दल त्यांना खूप प्रेम वाटते. मावशींना भाषा इत्यादी कळत नसली तरी हावभावांची भाषा वापरून त्या मारियाशी ‘हृदयाचे नाते’ जोडू शकल्या “कोलंबियातील वैद्यकीय क्षेत्रापेक्षा भारतातील वैद्यकीय क्षेत्र हे अधिक प्रभावी वाटते. तिकडे डॉक्टरच्या वेळा निश्चित होण्यासाठी महिनोनमहिने ताटकळावे लागते, डॉक्टर म्हणावा तेवढा वेळ देतीलच याची खात्री नसते व मुख्य म्हणजे वैद्यकीय उपचारासाठी अफाट खर्च आकाराला जातो. डॉक्टर्स व त्यांचा स्टाफ हा प्रथम वैद्यकीय नैतिक मूल्यास जपतो. भारतात येऊन योग्यवेळी इतकी उत्तम व्यैद्यकीय सेवा मिळाली, डॉ जैन यांनी शास्त्रक्रियेतील ‘निष्णातपण’ सिद्ध केले आहे. अपेक्स हॉस्पिटलमधील वास्तव्य व माणुसकीचे प्रेमळ दर्शन हि अनमोल भेट सोबत घेऊन आम्ही कोलंबियाला जाऊ” अशा शब्दात मारिया व त्यांच्या मुलीने कृतज्ञता व्यक्त केली तेव्हा शब्दांपेक्षा अश्रूच जास्त बोलत होते.
सध्या भारतात ‘मेडिकल टुरिझम’ – परदेशी रुग्णांसाठी उत्तम वैद्यकीय सेवा देण्यासाठी विशेष धोरण राबवण्यासाठी केंद्रसरकार, राज्यसरकार व सर्व वैद्यकीय क्षेत्रच पुढाकार घेत आहे. अस्थिरोगतज्ज्ञ व सर्जन्स अशा यशस्वी शास्त्रक्रियांद्वारे आपले योगदान देत आहेत. डॉ उमेश जैन यांचे यासाठी खास अभिनंदन व अपेक्स हॉस्पिटलच्या गौरवशाली पेचात हा एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. त्याचबरोबरीने प्रगत वैद्यकीय विश्वातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आपल्या कौशल्याने कोल्हापूर हे जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा देण्यास सक्षम असल्याचेच परदेशी महिला रुग्णावर उपचार करून सिद्ध केल्याचा अपेक्स परिवारास अभिमान आहे.
Leave a Reply