
कोल्हापूर/ प्रतिनिधी: वैद्यकीय क्षेत्रात होत असणारे नवनवीन बदल डॉक्टरांनी आत्मसात करणे अपरिहार्य असते. यासाठी शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील शिखर संस्था असणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखा कोल्हापुरच्यावतीने केएमए-कॉन आणि सर्व हॉस्पिटलच्या वतीने हॉस्पिकॉन- २०२२ या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन येत्या शनिवारी १९ मार्च २०२२ व रविवारी २० मार्च २०२२ रोजी हॉटेल सयाजी येथे करण्यात आले आहे.
या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुहास पिंगळे, कॅन्सर कंट्रोल आंतरराष्ट्रीय संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिल डीक्रूज, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, महाराष्ट्र राज्य आयएमएचे सचिव डॉ. मंगेश पाटील, तसेच होणारे नूतन अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ.सूरज पवार आणि आयएमए कोल्हापूरच्या अध्यक्षा डॉ.आशा जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी डॉ.राधिका जोशी यांना डॉ.अतुल जोगळेकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे
*”ड्रीम इनोव्हेट’ इंस्पायर* अशी यावर्षीची परिषदेची थीम म्हणजे *स्वप्न बघा.. संशोधन करा.. प्रेरित व्हा !* ही संकल्पना असून परिषदेमध्ये शनिवारी विविध तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये शनिवारच्या सत्रात डॉ. उमेश शहा, डॉ. नवीन सालीन्स,डॉ.रोहित रानडे, डॉ. राहुल पाटील, डॉ. कौस्तुभ मंचुरकर, डॉ. निषाद चिटणीस, डॉ.शिवकुमार उत्तुरे,डॉ. सुनील नाडकर्णी, डॉ. विवेकानंद कुलकर्णी, डॉ. मोहित भंडारी,डॉ.आदित्य कुलकर्णी, डॉ.अश्विन ताम्हणकर, डॉ. दिनेश ठाकरे, डॉ.मदन गुप्ता,डॉ. राजवर्धन घाटगे,डॉ. देवेंद्र जाधव, डॉ. जयश्री तोडकर, डॉ. इंद्रनील जाधव, डॉ. रेश्मा पवार आणि टीम, डॉ. कौस्तुभ वाईकर, डॉ. सुधाकर शिंदे, डॉ. सुरज पवार, डॉ.सलीम लाड हे सहभागी होणार आहेत. या परिषदेसाठी संपूर्ण जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातून तीनशेहून अधिक डॉक्टर्स व तज्ञ उपस्थित राहणार आहेत.स्वागत केएमएचे सचिव डॉ.किरण दोशी यांनी स्वागत केले. पत्रकार परिषदेस सल्लागार समिती सभासद डॉ.संदीप साळोखे, खजनिस ए.बी.पाटील, डॉ.राजेंद्र वायचळ,डॉ.देवेंद्र जाधव,डॉ.प्रसाद तानवडे,डॉ.अश्विनी पाटील,डॉ.अरुण धुमाळे,डॉ.शीतल पाटील, डॉ.इंद्रनील जाधव यांच्यासह तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.
Leave a Reply