इंदुरीकर महाराजांसंगे – तुकाराम महाराज बीज विशेष सोहळा

 

तुकाराम महाराज बीज विशेष सोहळा’ शेमारू मराठीबाणा वाहिनी वरील अल्पावधीतच अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या ‘कीर्तन रंगे इंदुरीकर महाराजांसंगे’ या ह.भ.प.श्री इंदुरीकर महाराजांच्या गाजलेल्या कीर्तनांच्या मालिकेमध्ये रविवार, २० मार्च रोजी संध्या. ७ वा. तुकाराम महाराज बीज निमित्त विशेष भाग दाखवण्यात येणार आहे.आपल्या कीर्तनातून जनतेला हसवून अंतमुर्ख करणारे प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प.श्री इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाची खासियत म्हणजे ते आपल्या खुमासदार निरुपणातून अंजन आणि रंजन अशा दोन्ही गोष्टी साध्य करतात. या विशेष भागात देखील ते संत तुकाराम महाराजांचे वर्णन आपल्या विशिष्ट कीर्तन शैलीत करणार आहेत.तेव्हा रविवार, २० मार्च रोजी, संध्या. ७ वा. शेमारू मराठीबाणा वाहिनीवर ‘कीर्तन रंगे इंदुरीकर महाराजांसंगे’ कीर्तन मालिकेत साजरा होणारा ‘तुकाराम महाराज बीज विशेष सोहळा’ आवर्जून अनुभवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!