
कसबा बावडा: दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे शहराच्या विकासाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्यावर आलेली आहे. त्यांना आधार, भक्कम पाठबळ देण्याचे काम कसबा बावडा व लाईन बझारची जनता नक्की करेल असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी येथे केले.
कोल्हापूर उत्तरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या कसबा बावड्यातील प्रचाराचा शुभारंभ बावड्याचे ग्रामदैवत हनुमान मंदिरात आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार ऋतुराज पाटील म्हणाले पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कसबा बावड्याने नेहमीच प्रत्येक वेळी साथ दिली आहे. येत्या १२ एप्रिलला जयश्री जाधव यांना बावड्यातून भरघोस मताधिक्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रचार शुभारंभ प्रसंगी श्रीराम सोसायटीचे चेअरमन हरी पाटील, संतोष पाटील, माजी नगरसेवक मोहन सालपे, डॉ. संदीप नेजदार, सुभाष बुचडे, अशोक जाधव तसेच गजानन बेडेकर, विनायक कारंडे, माधुरी लाड, सागर यवलुजे, राजीव चव्हाण ,मिलिंद पाटील ,राहूल माळी यांच्यासह विविध मंडळांचे कार्यकर्ते , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी आंबे गल्ली, बलभीम गल्ली, माळ गल्ली , पिंजार गल्ली, कवडे गल्ली, धनगर गल्ली ,चव्हाण गल्ली अधिक गल्लीतून प्रचार पत्रके देत आ.पाटील यांनी लोकांशी संवाद साधला.
Leave a Reply