
कोल्हापूर: महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकीची वज्रमूठ बांधलेले आहे. सर्वजण एकसंध होऊ, बहीण- भाऊ म्हणून माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. यामुळे विजय निश्चित आहे, याचा मला विश्वास आहे.आण्णांनी सर्वसामान्य जनतेला काय हवे आहे? याची जाणीव ठेवून मतदारसंघात विकासकामे केलेत. मतदारसंघातील सर्व प्रलंबित प्रश्न त्यांनी सरकार दरबारी मांडले. अनेक प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना यश आले. तसेच त्यांच्या स्वप्नातील कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच ही निवडणूक मी लढवत आहे.असे जयश्री जाधव म्हणाल्या.आज शिवाजी स्टेडियम येथील त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या कोल्हापुरात शाहू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारण्याचे काम, हुतात्मा पार्क व महावीर गार्डनच्या सुशोभीकरण, क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास, कोल्हापूरातील खेळ व खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत, कोल्हापुरातील क्रीडांगणे सर्वसोयीनीयुक्त करणे, महापुराच्या काळात शहराचा वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी सबस्टेशनची उंची वाढविणे, महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी रोजगार निर्मिती करणे, महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवणे असे अनेक कामे पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार सुरेश साळोखे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पवार, सुजित चव्हाण, माजी महापौर निलोफर आजरेकर, राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव बाजीराव खाडे, शिवाजी जाधव, संध्या घोटणे, स्मिता सावंत, अजित राऊत, महेंद्र चव्हाण, मनजीत माने, संपत चव्हाण, सुनील देसाई, निरंजन कदम यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply