
भाजपचे कोणते उत्तर भाजपच निरुत्तर: अशोक चव्हाण
कोल्हापूर/ प्रतिनिधी: कोल्हापूर उत्तरच्या पोट निवडणुकीत भाजप कडून खालच्या पातळीवर जाऊन आरोप होत आहेत. हे चिंताजनक आहे. त्यामुळेच उत्तर मतदारसंघात भाजप हे उत्तर नाही तर भाजपच निरुत्तर आहे. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांच्या कार्यक्षमतेवर शंका घेणे ही गोष्ट राजर्षी शाहूंच्या भूमीत तर न शोभणारी आहे. असे बोलण्याची हिंमत राज्यात कोणीही करणार नाही. त्यामुळेच येथे देगलूरची पुनरावृत्ती होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.तसेच निवडणूक असो किंवा शर्यत त्यात खिलाडूवृत्ती असणे गरजेचे आहे. भाजपने स्तर सोडला असला तरीही काँग्रेसने पातळी सोडलेली नाही. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर एक भगिनी जयश्री जाधव हिमतीने निवडणुकीत उतरल्या आहेत. महाआघाडी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,ज्येष्ठ नेते शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांनी लक्ष घातले. शिवसेनेचे राजेश क्षिरसागर प्रचारात आहेत. मंत्री सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार पी.एन.पाटील सर्वच अथक प्रयत्न करीत असल्याने येथे देगलूरची पुनरावृत्ती होईल. असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. भाजप हेच उत्तर हे स्लोगनचे फलक मी पाहिले. मला एवढेच म्हणायचे आहे की आज पेट्रोल 120 रुपये डिझेल 103 रुपये असताना घरगुती गॅस सिलेंडर वाढत आहे तरीदेखील गल्लीबोळातील ते संसदेच्या निवडणुकीपर्यंत त्या कशा जिंकायच्या यासाठी शेवटी हिंदू-मुस्लीम यांचे आणून भाजपने ध्रुवीकरण केले आहे. त्यामुळे भाजप हे उत्तर नाही तर या निवडणुकीत भाजप निरुत्तर होणार आहे. असेही अशोक चव्हाण म्हणाले. ज्या वेळी समोरून हल्ला होतो त्याला प्रत्युत्तर तर द्यावेच लागते. भाजपने पंढरपूर असो वा नांदेड येथील निवडणुकीत देशातील नेते आणले. आम्हाला आघाडीची जागा राखावी लागेल. मराठा आरक्षणावर ते म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाची दिशाभूल केली आहे. संसदेत खासदार संभाजीराजेनाही बोलू दिले नाही. आज सर्वांना हे पुरेपूर समजले आहे. खासदार शरद पवारांच्या घरावरील हल्ला हा नियोजित असून त्याचा सूत्रधार शोधला पाहिजे.असेही ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील उपस्थित होते.
Leave a Reply