सुवर्ण सतेज संकल्पनेतून, जिल्ह्यातील 50 हजार गरजूंना शाश्वत लाभ देणार:पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सुरूवात

 

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील यांच्या 50 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुवर्ण सतेज संकल्पनेतून, जिल्ह्यातील 50 हजार गरजूंना शाश्वत लाभ देण्याचा निर्धार ना. पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. याची सुरुवात आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते विविध योजनेतील लाभार्थ्याना प्रातिनिधिक स्वरूपात पत्रे देऊन करण्यात आली. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त पन्नास हजार लाभार्थ्यांना विविध योजनेचा लाभ देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. वर्षभर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.यावेळी श्रम कार्ड, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकाम महामंडळ, कौशल्य विकास योजना, श्रावण बाळ योजना, बांधकाम कामगार योजना, संजय गांधी निराधार योजना, शेतकरी विमा, गडहिंग्लज येथील नागरिकांना डस्ट बिन वाटप, तसेच दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी अशा विविध योजनेतील लाभार्थ्यांना मंजूर पत्रांचे वाटप यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी, सत्तेचा फायदा सामान्य जनतेला झाला पाहिजे हा ध्यास घेऊन वाटचाल करत आहे. सार्वजनिक कामे प्राधान्याने झाली पाहिजे हे तत्व मी नेहमीच जपले आहे. शासनाच्या विविध योजना या सामान्य गरजू माणसापर्यंत पोहोचणे हे फार महत्वाचे आहे. सामान्य नागरिक कोणत्याही योनेपासून वंचित राहता कामा नये, या साठी कार्यकर्त्यांनी नियोजनबद्धरित्या काम करावे .गरजू लोकांना शाश्वत स्वरूपाचा लाभ मिळवून देण्याचा कार्यकर्त्यांनी केलेला संकल्प समाधान देणारा आहे , असे ही त्यांनी नमूद केले.सामान्य माणसाला आधार देण्याचं काम करा , मुला- मुलीच्या शिक्षणासाठी मदत करा, असे आवाहनही पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.आमदार ऋतुराज पाटील यांनी, समाजकारण आणि राजकारणात वेगळ्या पद्धतीने काम करून ना.सतेज पाटील यांनी आमच्यासारख्या युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. आजपर्यंत वाढदिवसानिमित्त जमा झालेल्या 65 लाख वह्या 15.लाख विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. त्यामुळे 50 हजार गरजूंना विविध योजनांचा लाभ देण्याचा करण्यात आलेला संकल्प देखील सक्षमपणे राबवण्याचं आवाहन त्यांनी केलं. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नियोजन करून तेथील गरजूंना मदत करण्याची भूमिका घ्यावी अशी सूचनाही आमदार ऋतुराज पाटील यांनी केली.यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी, शासनाच्या विविध योजना लाभार्थी पर्यंत पोहचविण्या बरोबरच 60 वर्षांवरील नागरिकांना विमानाने तिरुपती दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे असे जाहीर केले.काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी, महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांच्या वतीने, पाच इलेक्ट्रिक वाहन कचरा गोळा करण्यासाठी देण्याचे जाहीर केले.गोकुळचे संचालक प्रकाश पाटील यांनी, गोकुळ संचालकांच्या वतीन रुग्णवाहिका देण्याचं जाहीर केले तर गोकुळ संचालक अंजना रेडेकर यांनी आपल्या मेडिकल कॉलेज मधून रुग्णांना डोळ्यावर मोफत शस्त्रक्रियेचा लाभ देणार असल्याचे जाहीर केलं. इचकरंजी नगरपालिकेचे माजी नगरसेवक राहुल खंजीरे यांनी, इचलकरंजी मधील 5 हजार लाभार्थीना विविध योजनाच्या लाभाचे वाटप, तसच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणार असल्याचे सांगितले. त्याच बरोबर जिल्हा बँकेच्या संचालिका स्मिता गवळी यांनी
बँकेच्या माध्यमातून विविध योजना लाभार्थ्यांना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं.वैशाली महाडिक यांनी,महिला काँग्रेसच्यावतीन 50 हजार झाडे लावण्यात येतील असे सांगितले माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, भुदरगड काँग्रेस तालुका अध्यक्ष शामराव देसाई ,विजयसिंह मोरे, सामजिक कार्यकर्ते अमर पाटील, रणजीत माने-पाटील, सदाशिवराव चरापले यांनी मनोगत व्यक्त .केले.यावेळी गोकुळचे संचालक बाबासो चौगुले, बाजार समिती संचालक सचिन घोरपडे, माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील, गडहिग्लज पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर गुरबे, प्राचार्य डॉ . महादेव नरके आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!