उद्योग क्षेत्राच्या समस्या शासन स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध :आ.जयश्री जाधव 

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : उद्योग क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण व्हावी उद्योग क्षेत्राची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी अशा प्रदर्शनाचे प्रत्येक वर्षी आयोजन करणे गरजेचे आहे. उद्योजकांच्या समस्या आणि त्या सोडवण्यासाठी अण्णांची सर्व सुरू असलेली धडपड मी जवळून पाहिली आहे. उद्योगसाठीच्या ज्या समस्या आहेत व जागेची समस्या आहेत अनेक प्रश्न आहेत.हे प्रश्न आणि अशा विविध समस्या या शासनापर्यंत पोहोचवणे व त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे नूतन आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी आश्वासन दिले.व्हायब्रन्ट महाएक्स्पो २०२२ प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या.
नवनवीन संकल्पना नागरिकांना माहिती करून देण्याचा हा प्रदर्शन महत्वपूर्ण उपक्रम उद्योगधंदे कोल्हापूर साठी नवीन नाहीत शाहू महाराज यांचा उद्योगासाठी आग्रह असायचा उदयोगासाठी शाहू महाराजांनी नेहमी मदत केली त्याचाच परिणाम म्हणून आपल्या भागात उदयोगाचं जाळं उभारले आहे.नवनवीन तंत्रज्ञा्नांची जोड देण, नॉलेज बेसड इंडस्ट्रीज हि संकल्पना आता महत्वाची आहे.
या नवनवीन संकल्पना राबवत असताना सामाजिक जाणीव असणे गरजेचे आहे.जिल्ह्यात उपक्रम हाती घेणे गरजेचे आहेत. तृतीय पंथी आणि वेश्या व्यवसाय या दोन गटाकडे आपण लक्ष देण गरजेचे आहे. हे दोन घटक सर्वात जास्त उपेक्षित घटक आहेत.या घटकांसाठी पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून त्यांचं सक्ष्मीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत आपण उद्योजक या नात्याने या वर्गातील किमान एक व्यक्तीची निवड करावी आपल्याकडील कामासाठी करावी असे अवाहन जिल्हाधिकारी श्री. राहुल रेखावार यांनी केले.
या उपेक्षित वर्गालात्यांच्या चक्रव्यहातून बाहेर काढण्यासाठी त्यांना मदत करायची आहे या वर्गसमोर असणारा अंधार दूर करावा असे आवाहन केले.यातूनहि औद्योगिक बाजारपेठ आपण आणखी पुढे घेऊन जाल असेही सांगितले.यावेळी बोलताना नूतन आमदार
श्रीमती जयश्री जाधव यांनी या उद्योग क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण व्हावी उद्योग क्षेत्राची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी अशा प्रदर्शनाचे प्रत्येक वर्षी आयोजन करणे गरजेचे आहे. उद्योजकांच्या समस्या आणि त्या सोडवण्यासाठी अण्णांची सर्व सुरू असलेली धडपड मी जवळून पाहिली आहे. उद्योगसाठीच्या ज्या समस्या आहेत व जागेची समस्या आहेत अनेक प्रश्न आहेत.हे प्रश्न आणि अशा विविध समस्या या शासनापर्यंत पोहोचवणे व त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे आश्वासन दिले.
प्रयोजक रिलायन्स पॉलिमर
सत्यजित भोसले प्रयोजक सदाशिव बर्गे, प्रयोजक संजय नेहरे,यांचा व
विशेष सत्कार – ओंकार दळवी, विजय पाटील -व्याख्याते यांचा करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर शिवाजी पोवार,यम आय डी.सी रिजनल ऑफिसर राहुल भिंगारे,जयेश ओसवाल महाराष्ट्र चेंबरचे सागर नांगरे उपस्थित होते.
कोरोनाच्या कालावधीमध्ये बाजारामध्ये आर्थिक मंदीची स्थिती असतानाही कोल्हापूर मध्ये आयोजित व्हायब्रंट महाएक्स्पो २०२२ या प्रदर्शनास उद्योजकांसह, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व गर्दी चार दिवस केली होती. आजच्या शेवटच्या दिवशीही उद्योजकांनी व महाविद्यालयीन इंजिनियर विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी शाहूपुरी जिमखाना मैदान येथे गर्दी केली होती. मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन कोल्हापूर हे व्हायब्रंट महाएक्स्पो २०२२ हे भव्य आणि आधुनिक पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक आणि मशिनरी यांचे प्रदर्शन १५ ते १८ एप्रिल या कालावधीत कोल्हापूर मध्ये आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा आज समारोप कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री राहुल रेखावार,नूतन आमदार श्रीमती जयश्री जाधव,एमआयडीसीचे रिजनल ऑफिसर राहुल भिंगारे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. समारोपानंतर स्टॉलधारक कंपन्यांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रदर्शनाचे व्यवस्थापन हे क्रिएटिव्हज एक्झिबिशन अँन्ड इव्हेट व हाऊस ऑफ इव्हेंट या संस्थेचे सुजित चव्हाण यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!