
कोल्हापूर : दिपक फर्टिलायझर्स व पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DFPCL) यांच्या स्मार्टकेम लिमिटेड (STL) या शाखेने त्यांच्या महाधन क्रॉपटेक ऊस पिकासाठी सर्वोत्तम अशा खताचे प्रात्यक्षिक कोल्हापूर जिल्ह्यतील हातकणंगले तालुक्यातील घुणकी गावच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आयोजित केले होते.
शेतकऱ्यांना अद्ययावत माहिती मिळावी, तसेच त्यांना तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हे प्रात्यक्षिक होते.या वेळी STL च्या तज्ञांनी शेतकऱ्यांना पिकांची उत्तम वाढ होण्यासाठी व उत्पादन वाढण्यासाठी महाधन क्रॉपटेक कसे
उपयुक्त आहे व त्याच्या वापरासंबंधीही मौलिक मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस ऊस उत्पादनात अग्रेसर असलेल्या भागांतील जवळजवळ १०० शेतकरी उपस्थित होते.
STL चे एरिया सेल्स मॅनेजर श्रीकांत मोरे यावेळी बोलताना म्हणाले, की “शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन सुविधा देण्यास स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेड नेहमीच तत्पर असते. खास ऊस पिकाच्या प्राथमिक, दुय्यम व सुक्ष्म पोषणमुल्यांसाठी बनवलेले महाधन क्रॉपटेक हे खत कित्येक शेतकऱ्यांनी वापरले व ते त्यांच्या पसंतीसही उतरले आहे. वाढते उत्पादन शुल्क व तुलनेने स्थिर उत्पादन यामुळे ऊस उत्पादक अस्वस्थ आहेत. अशा वेळी हे खत नक्कीच त्यांच्या मदतीला येऊ शकते.”
महाधन क्रॉपटेक गुजरात,महाराष्ट्रात व कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे. हे खत विशेषतःउसाच्या पिकास लागणाऱ्या प्राथमिक, दुय्यम व सुक्ष्म पोषणमुल्यांना लक्षात घेऊन बनवले आहे. एकीकडे खतांच्या खर्चात
१५-२०% कपात तर दुसरीकडे उत्पादनात १०-१५% वाढ असा दुहेरी फायदा याने होईल.”
सुजान मोटे व अजित एकशिंगे-सेल्स मॅनेजर STL म्हणाले “रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे व मातीच्या घसरत्या गुणवत्तेमुळे पिकांना सुक्ष्म व अतिसुक्ष्म पोषणमुल्ये देणे व त्याचवेळी जमिनीचा पोतही राखणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे,काही वेळेस योग्य माहितीअभावी शेतकरी चुकीची खते वापरतात. पण आता महाधन क्रॉपटेकच्या माध्यमातून विशेषतः ऊस पिकाच्या बाबतीत होणाऱ्या त्या चुका सुधारणे शक्य होईल”
या खताच्या प्रात्यक्षिकाच्या वेळी महाधन क्रॉपटेक वापरकर्ते व शेतकरी दिनकरराव जाधव म्हणाले , “गेली कित्येक वर्षे मी माझ्या ऊस पिकावर विविध खते वापरुन पाहिली. त्यांनी उत्पादन तर वाढलेच नाही, उलट ते सर्व फार खर्चिकही होते. पण जेव्हापासून महाधन क्रॉपटेक वापरले, तेव्हापासून परिस्थितीत बरीच सुधारणा आहे. उसाची उंची मध्ये वाढ दिसून आली आहे तसेच पिकाची पाने पूर्वीपेक्षा हिरवीगार दिसून येत आहेत.”
Leave a Reply