
कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीमध्ये कोल्हापूर हे माझे आजोळ होते आणि माझ्या आजवरच्या कोल्हापूरकरांनी माझा शब्द खरा करून दाखवला असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार आमदार जयश्री जाधव यांनी विजयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली.जयश्री जाधव यांचे यावेळी त्यांनी अभिनंदन केले. जातीयवाद्यांबरोबर कोल्हापूरकर कधीच जात नाहीत. हा शब्द त्यांनी खरा करून दाखवला. जातीयवादी विचारांना कधीच कोल्हापुरात थारा मिळत नाही. असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला होता तो शब्द खरा ठरल्याचे समाधान देखील शरद पवार यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासासाठी हे जनतेने आपल्याला निवडून दिले आहे. मतदार संघासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. जयश्री जाधव यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा असणारे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे देखील अभिनंदन करण्यात आले.यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री व कामगार मंत्री हसन मुश्रीफ, तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मालोजीराजे उपस्थित होते.
Leave a Reply