
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते. त्यांच्या विचारातून आणि कल्पनाशक्तीतून विविध क्षेत्राचा कायापालट झाला आहे. त्यांच्या स्वर्गवासानंतरही १०० वर्षांनीसुद्दा आज आपण त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या सोयींची गोड फळे चाखत आहोत. त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणेसाठी व घराघरात त्यांची प्रतिमा पोहोचली पाहिजे या विचाराने गोकुळचे चेअरमन श्री. विश्वास नारायण पाटील व गोकुळचे सर्व संचालक मंडळ यांनी छ. शाहू महाराजांची प्रतिमा असलेली दिनदर्शिका गोकुळमार्फत प्रकाशित करण्याचा विचार अस्तित्वात आणला. या दिनदर्शिकेचे प्रकाशन श्री शाहू मिल्सच्या प्रांगणात आयोजित केलेल्या राजर्षी शाहू कृतज्ञता पर्वाच्या भव्य अश्या ऐतिहासिक सोहळ्यात कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षेतेखाली व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नाम.बाळासाहेब थोरातसो व उच्च शिक्षण मंत्री नाम.उदय सामंतसो यांच्या शुभहस्ते तसेच ग्रामविकास मंत्री नाम.हसन मुश्रीफसो व जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.सतेज पाटीलसो, राज्य आरोग्य मंत्री नाम.राजेद्र पाटील यड्रावकरसो, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, खा. संजय मंडलिकसो, खा.धैर्यशील मानेसो , आ. पी.एन.पाटीलसो, आ. प्रकाश आबिटकरसो, आ.राजेश पाटीलसो, आ.श्रीमती जयश्री जाधवसो,जिल्हाधिकारी राहुल रेखावारसो, गोकुळचे जेष्ठ संचालक अरूण डोंगळेसो, संचालक अजित नरकेसो, संचालिका श्रीमती अजंना रेडेकरसो, तसेच सर्व शासकिय अधिकारी व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.या दिनदर्शिका गोकुळशी संलग्न असणाऱ्या प्राथमिक दूध संस्था व सबंधीत सर्व घटकांना देण्यात आल्या आहेत.
Leave a Reply