
बहिरेवाडी:बांधकाम कामगारांच्या आयुष्याचे कोटकल्याण करण्याची क्षमता इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये आहे. हे मंडळ म्हणजे बांधकाम कामगारांसाठी न आटणारा समुद्र आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कार्यकर्त्यांनी बांधकाम कामगारांच्या योजना घराघरापर्यंत पोहोचवा, असेही ते म्हणाले.
बहिरेवाडी ता. आजरा येथे बांधकाम कामगारांना सुरक्षा संचासह अत्यावश्यक साहित्य वाटप व त्यांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती वाटप या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ५२१ बांधकाम कामगारांना साहित्य वाटप व ११० विद्यार्थ्यांना १४ लाख रुपये शिष्यवृत्तीचे वाटप प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाले.भाषणात मंत्री श्री पुढे म्हणाले, बहिरेवाडी गावाचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षणतज्ञ जे. पी. नाईक यांचे गावाच्या प्रवेशद्वाराजवळच सुंदर स्मारक पूर्ण झाले आहे. लवकरच शहीद जवान ऋषिकेश रामचंद्र जोंधळे यांचे स्मारकही पूर्ण करू. तसेच; गावाच्या प्रवेशद्वाराजवळच असलेल्या गाव तलावाचेही सुशोभीकरण करू. त्यामुळे या रस्त्यावरून गोव्याला जाणारे- येणारे पर्यटक किमान दहा मिनिटं तरी या गावात थांबतील, असा विश्वासही मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, जयवंत शिंत्रे यांचीही मनोगते झाली.
Leave a Reply